शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

... तेव्हा शरद पवार यांनी साधा निषेधसुद्धा का केला नाही?

By admin | Updated: August 31, 2016 00:38 IST

औरंगाबाद : अलीकडे एकट्या अहमदनगर जिल्ह्यातच दलित अत्याचाराच्या १५० हून अधिक घटना घडल्या. आजही देशभर दलितांवरील अन्याय- अत्याचाराच्या,

औरंगाबाद : अलीकडे एकट्या अहमदनगर जिल्ह्यातच दलित अत्याचाराच्या १५० हून अधिक घटना घडल्या. आजही देशभर दलितांवरील अन्याय- अत्याचाराच्या, दलित महिलांवरील बलात्काराच्या घटना घडतच आहेत. मुस्लिमांवरही अन्यायसत्र सुरुच आहे. याबाबतीत शरद पवार का बोलत नाहीत, प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन आस्थेवाईकपणे चौकशी करणे तर दूरच पण साधा निषेधही ते का करीत नाहीत? असा सवाल राज्यसभेचे काँग्रेसचे सदस्य हुसेन दलवाई यांनी उपस्थित केला. सकाळी ते पत्रकारांशी वार्तालाप करीत होते. महिला कोणत्याही जाती- धर्माची असो, ती आपली बहीण असते. तिच्यावरील अन्याय-अत्याचाराचा, बलात्काराचा निषेधच झाला पाहिजे. कोपर्डीच्या घटनेचेही कोणी समर्थन करणार नाही. सर्व दलित नेत्यांनीही निषेधच नोंदवला आहे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी रामदास आठवलेंपासून सर्वांनी केली आहे; परंतु सध्या राज्यभर विशिष्ट जातीचे मोर्चे काढण्याचा प्रयत्न होत आहे. मोर्चेच काढायचे तर मग सर्व जातींंना सोबत घेऊन काढा असे दलवाई यांनी सुचविले. यासंबंधात अधिक विश्लेषण करताना त्यांनी सांगितले की, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे, असे शरद पवार म्हणतात. आज अशावेळी त्यांच्यासारख्या नेत्याने असे म्हणणे दुर्दैवी वाटले. यामुळे महाराष्ट्रातील जातीय सलोखा बिघडू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे. मराठा समाजाच्या मुलांना भडकवण्याचा हा प्रयत्न वाटतो. यामागे राजकारण तर आहेच. पण आरक्षणाचा मुद्दाही दिसतो. सत्तेचे राजकारणही यात आहेच. मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासांना वंचित कुणी ठेवले? त्यांचा विकास करू नये असे कुणी म्हटले का? अ‍ॅट्रॉसिटीमध्ये काय दुरुस्ती व्हावी हेसुद्धा शरद पवार यांनी सांगितले पाहिजे. केवळ राजकारणासाठी असले मुद्दे उचलणे योग्य नाही. महाराष्ट्राच्या पुरोगामी वातावरणाला प्रतिगामी करण्याचा प्रयत्न करूनये. समाज दुभंगेल, असे काही शरद पवार यांनी करू नये. औरंगाबाद येथील हज हाऊसचे काम निधी असतानाही संथगतीने चालू आहे. आगामी रमजानपर्यंत हे काम पूर्ण झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.