शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

चण्याच्या गोणीत कोणाचे गहू़़?

By admin | Updated: December 23, 2014 00:08 IST

उदगीर : उदगीरच्या पुरवठा विभागाचा गुंता साक्षात ब्रम्हदेवालाही सुटणार नाही़ रेशन कार्डाचा घोळ, याद्यांचा घोळ, वितरण व्यवस्थेचा महाघोळ सुरु असतानाच

उदगीर : उदगीरच्या पुरवठा विभागाचा गुंता साक्षात ब्रम्हदेवालाही सुटणार नाही़ रेशन कार्डाचा घोळ, याद्यांचा घोळ, वितरण व्यवस्थेचा महाघोळ सुरु असतानाच आता एका गव्हाच्या ट्रकने पुन्हा या विभागाकडे संशयाची सुई वळली आहे़ उदगीरहून कर्नाटकात चाललेला हा ट्रक देवणी पोलिसांनी पकडला खरा मात्र त्याचे गौडबंगाल आठवडाभरानंतरही उलगडले नाही़ चन्याच्या गोणीतून गव्हाची वाहतूक होत असल्याने संशय बळावला आहे़ देवणी पोलिसांनी तोगरी मोड येथे लावलेल्या चेकपोस्टवरील कर्मचाऱ्यांनी मागील आठवड्यात एका ट्रकची तपासणी केली़ उदगीरहून कर्नाटकाच्या दिशेने निघालेल्या या ट्रकमध्ये गव्हाचा साठा होता़ परंतु, ओळखू येऊ नये, यासाठी हा गहू चन्याचे लेबल असलेल्या गोण्यांत भरला होता़ प्रथमदर्शनी या गोण्यांत चणे भरले असावेत, असे भासविण्यात आले होते़ मात्र, पोलिसांनी कसून चौकशी व तपासणी केली असता चन्याच्या गोण्यांत गहू असल्याचे आढळून आले़ हा प्रकार संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी गव्हाच्या गोण्यांनी भरलेला हा ट्रक ताब्यात घेऊन ठाण्यात लावला़ हा गहू रेशनचा की व्यापाऱ्याचा याची चाचपणी करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ महसूल विभागास पत्र दिले़ हे पत्र मिळाल्यानंतर उदगीरचे नायब तहसीलदार बालाजी चितळे यांनी देवणीचे पोलिस ठाणे गाठून गव्हाची तपासणी केली़ पोलिसांनी ताब्यात घेतलेला गहू व उदगीरच्या पुरवठा विभागाच्या गोदामातील गव्हाचे नमुने घेऊन चितळे यांनी ते तपासणीसाठी परभणीच्या कृषी विद्यापीठाकडे पाठविले आहेत़ त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे़ (वार्ताहर)४उदगीरच्या पुरवठा विभागातील वितरण व्यवस्थेतील त्रुटी, ताब्यातील ट्रक उदगीरमधून निघाला होता, या बाबी लक्षात घेता संशयाची सुई उदगीरकडेच वळते आहे़ यापूर्वीही कर्नाटक व आंध्रप्रदेशात जाताना रेशनचे गहू पकडले गेल्याची उदाहरणे समोर असल्याने या संशयाला पुष्टी मिळत आहे़ ४देवणी पोलिसांनी उभारलेल्या चेकपोस्टवर तपासणी करीत असताना हा ट्रक आढळून आला़ तपासणी दरम्यान, आतील गहू रेशनचा असल्याचा संशय बळावल्याने तो ताब्यात घेण्यात आला आहे़ महसूल विभागाने नमुने तपासणीसाठी घेतले आहेत़ त्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई करता येईल, असे देवणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही़एम़ केंद्रे यांनी सांगितले.