शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रविवारपासून ‘ज्याचा माल, त्याचा हमाल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:02 IST

औरंगाबाद : मालट्रकमध्ये माल रचणे, ट्रकमधील माल फळक्यापर्यंत उतरविणे (वराई) यासाठी हमालांना हमाली द्यावी लागते. यावरून वाहतूकदार व ...

औरंगाबाद : मालट्रकमध्ये माल रचणे, ट्रकमधील माल फळक्यापर्यंत उतरविणे (वराई) यासाठी हमालांना हमाली द्यावी लागते. यावरून वाहतूकदार व व्यावसायिकांमध्ये होणाऱ्या वादावर मालवाहतूकदार संघटनेने तोडगा काढला असून, ‘ज्याचा माल, त्याचा हमाल’ असा नवीन नियम १ ऑगस्टपासून संपूर्ण देशात लागू करण्यात येणार आहे.

येत्या काळात वराईचा प्रश्न चिघळेल, अशी चिन्हे दिसत आहेत. यासंदर्भात नवी दिल्ली येथील ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसने एक परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार औरंगाबाद गुडस्‌ ट्रान्स्पोर्ट असोसिएशनची शनिवारी बैठक झाली. तेव्हा अध्यक्ष फय्याज खान यांनी सांगितले की, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालाची वाहतूक करणे ही वाहतूकदारांची जबाबदारी आहे; परंतु बऱ्याच ठिकाणाहून वाहतूकदारांकडून बळजबरीने लोडिंग, अनलोडिंगची हमाली (वराई) वसूल केली जात असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या.

यामुळे यापुढे आता ‘ज्याचा माल, त्याचा हमाल’ हे देशव्यापी एकच धोरण संघटनेने ठरविले आहे. याची अंमलबजावणी १ ऑगस्टपासून सुरू होईल. कंपन्या, दुकानदार यांनाच वराई द्यावी लागणार आहे. मालवाहतूकदारांवर फक्त माल वाहतुकीची जबाबदारी असणार आहे. येथे झालेल्या बैठकीत संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष असद अहेमद, उपाध्यक्ष राजेंद्र माहेश्वरी, महासचिव जयकुमार धानवी व अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.

चौकट

समन्वयातून वराईचा प्रश्न सोडवावा

आतापर्यंत ट्रकमध्ये माल रचण्यासाठी व तो फळक्यावर आणून देण्यासाठी मालवाहतूकदारच वराई देत होता. वाहतूकदारांना वराई देणे परवडत नसेल, तर त्यांनी दुकानदारांकडून वराईचे दर वाढवून घ्यावेत. शेवटी मालवाहतूकदार किंवा व्यापारी या दोघांपैकी कोणालातरी वराई द्यावी लागणारच आहे. हा प्रश्न मालवाहतूकदार व व्यापाऱ्यांनी समन्वयातून सोडवावा.

-सुभाष लोमटे,

सरचिटणीस, राज्य हमाल मापाडी महामंडळ

चौकट..............................

हमाल बेरोजगार होतील

वराई घेणारे हमाल मालवाहतूकदारांचे होते. जर व्यापाऱ्यांनी वराई देण्याचे ठरविले, तर ते स्वत:कडील हमालाकडूनच वराईचे काम करून घेतील. त्यामुळे मालवाहतूकदारांकडे असणारे हजारो हमाल बेरोजगार होतील.

-नीलेश सेठी,

अध्यक्ष, जनरल किराणा मर्चंट असोसिएशन