उस्मानाबाद : तलवार, लोखंडी रॉड, ट्युब नळी, लाकडी दांडक्याने झालेल्या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले़ तर इतर तिघे किरकोळ जखमी झाले़ ही घटना शुक्रवारी भर दुपारी व सायंकाळी उस्मानाबाद शहरातील एमआयडीसी भाग व आंबाला हॉटेल परिसरात घडली असून, या प्रकरणी आनंदनगर व शहर पोलीस ठाण्यात १० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या घटनेला २४ तास लोटण्यापूर्वीच शहरातील राजेबाग महादेव मंदीर परिसरात एकावर तलवारीने वार करण्यात आले असून, त्याच्या साथीदारासही मारहाण करण्यात आली़ ही घटना शुक्रवारी सकाळी घडली असून, या प्रकरणी ७ जणांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़या घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद शहरातील लिंबराज अप्पाराव डुकरे (वय-२४) व भिमाजीत चव्हाण हे दोघे गुरूवारी दुपारी एमआयडीसी भागातील एका हॉटेलमध्ये थांबले होते़ त्यावेळी तेथे आलेल्या सात जणांनी मागील भांडणाची कुरापत काढून तलवारीने हल्ला केल्याने लिंबराज डुकरे हा जखमी झाला़ या मारहाणीत डुकरे याच्यासोबत असलेला भिमाजीत चव्हाण हाही जखमी झाला़ याबाबत जखमी डुकरे याने दिलेल्या फिर्यादीवरून मयुर बनसोडे, गोप्या बनसोडे (दोघे रा़ उस्मानाबाद) यांच्यासह इतर पाच असे सात जणाविरूध्द आनंदनगर पोलीस ठाण्यात गुरूवारी रात्री गुन्हा दाखल झाला़ या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि तांबे हे करीत आहेत़ उस्मानाबाद शहरातील भीमनगर भागातील सागर परमेश्वर गायकवाड हा गुरूवारी सायंकाळी त्याच्या दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२५- २३५८) वरून घराकडे जात होता़ त्यावेळी तेथे आलेल्या तिघांनी ‘तू भिमनगरचा आहेस का ’ असे म्हणत लोखंडी रॉड, ट्यूब, नळी, लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली़ या मारहाणीनंतर काही वेळातच तुळजापूर नाका परिसरात असलेले राजपाल कसबे यांना मारहाण करून त्यांच्या रिक्षाचे (क्ऱ एम़एच़२५-१४४८) नुकसान करण्यात आले़ तसेच बापू बनसोडे यांच्याकडे कामाला असलेला कामगार नाना पवार यालाही मारहाण करण्यात आल्याची फिर्याद जखमी सागर गायकवाड याने शहर पोलीस ठाण्यात दिली़ या वरून कैलास अर्जुन साठे (रा़सांजा), हणुमंत झाडके (रा़ काकानगर) व ऋषीकेश सूर्यवंशी-पाटील (रा़सांजा) या तिघांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास सपोनि उत्तम जाधव हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)
भरदिवसा तलवारींचा नंगानाच
By admin | Updated: January 21, 2017 00:05 IST