उस्मानाबाद : शहरातील सांजा चौकातील बायपासवरील एका शिक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा २ लाख ८७ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ ही घटना शनिवारी सकाळी घडली असून, या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सांजा चौकानजीकच्या साईकमल हॉटेलच्या पाठीमागे साहेबराव त्र्यंबकराव जगदाळे या शिक्षकाचे घर आहे़ जगदाळे व त्यांच्या घरातील सदस्य शनिवारी सकाळी ९़३० च्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेले होते़ घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी रोख ४७ हजार रूपये व सोन्याचे दागिने असा जवळपास २ लाख ८७ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ घटनेची माहिती मिळताच आनंदनगर पोलीस ठाण्याचे सपोनि दिगंबर शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला़ या प्रकरणी साहेबराव जगदाळे यांच्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
भरदिवसा शिक्षकाचे घर फोडले
By admin | Updated: March 5, 2017 00:36 IST