लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कचरा कोंडीचा प्रश्न महापालिकेला मागील सहा दिवसांमध्ये सोडविता आला नाही. मेटाकुटीला आलेल्या मनपाने बुधवारी याप्रश्नी तोडगा काढावा म्हणून शासनालाच विनंती केली. राज्य शासनानेही त्वरित विभागीय आयुक्तांना सूचना देऊन युद्धपातळीवर कच-याचा प्रश्न सोडवावा, अशा सूचना दिल्या. रात्री उशिरा मनपा, महसूल आणि पोलीस प्रशासनाचे एक पथक नारेगाव येथे आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी पोहोचले. आंदोलनकर्त्यांनी विभागीय आयुक्तांच्या पथकासमोरही आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. मात्र, उद्या नारेगावात कचरा टाकण्यात येणार असल्याचे अल्टिमेटम आंदोलकांना देण्यात आले.१६ फेब्रुवारीपासून नारेगाव भागातील शेतकºयांनी कचरा डेपो हटाव, या मुख्य मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. मागील सहा दिवसांमध्ये शहरातील कचºयाचे एकही ट्रक नारेगावात गेले नाही. शहरात जवळपास २४०० मेट्रिक टन कचरा पडून आहे. मनपाने विविध वसाहतींमधून उचलेला कचरा मध्यवर्ती जकात नाका येथे आणून टाकण्यात येत आहे. येथेही आता प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. बुधवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांना कचरा प्रश्नाची वस्तुस्थिती सांगितली. त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे हा निरोप पोहोचवला. त्यानंतर विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश शासनाने दिले. सायंकाळी पाच वाजता विभागीय आयुक्तांकडे एका व्यापक बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत नारेगाव येथील आंदोलकांसोबत एकदा चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. विभागीय आयुक्तांनी आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी सहा जणांचे शिष्टमंडळ नेमले. यामध्ये मनपाचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली, डी.पी. कुलकर्णी, उपविभागीय आधिकारी शशिकांत हदगल, अप्पर तहसीलदार रमेश मुंडलोड, तहसीलदार सतीश सोनी यांचा समावेश होता. शिष्टमंडळ रात्री उशिरा नारेगाव येथे आंदोलकांसोबत चर्चा करण्यासाठी गेले. त्यांनी कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामुग्री उभारण्यासाठी दोन महिने लागणार आहेत. तोपर्यंत मुभा द्यावी, अशी विनंती केली. आंदोलकांनी ही विनंती फेटाळून लावली.
औरंगाबादच्या कच-याचा प्रश्न कोण सोडवणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:15 IST
शहरातील कचरा कोंडीचा प्रश्न महापालिकेला मागील सहा दिवसांमध्ये सोडविता आला नाही. मेटाकुटीला आलेल्या मनपाने बुधवारी याप्रश्नी तोडगा काढावा म्हणून शासनालाच विनंती केली. राज्य शासनानेही त्वरित विभागीय आयुक्तांना सूचना देऊन युद्धपातळीवर कच-याचा प्रश्न सोडवावा, अशा सूचना दिल्या. रात्री उशिरा मनपा, महसूल आणि पोलीस प्रशासनाचे एक पथक नारेगाव येथे आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी पोहोचले. आंदोलनकर्त्यांनी विभागीय आयुक्तांच्या पथकासमोरही आंदोलन मागे घेण्यास नकार दिला.
औरंगाबादच्या कच-याचा प्रश्न कोण सोडवणार ?
ठळक मुद्देकच-याचा विषय शासन दरबारी