शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
3
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
4
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
5
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
6
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
7
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
8
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
9
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
10
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
11
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
12
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
13
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
14
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
15
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
16
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
17
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
18
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
19
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
20
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा

‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर दिसणार कोणाला मतदान केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 22:52 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’सह ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राद्वारे मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. आपण कोणाला मतदान केले ते लगेच ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर सात सेकंद मतदारास दिसणार आहे.

ठळक मुद्देनिवडणुकीतील पारदर्शकता : मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांनी घेतला आढावा

औरंगाबाद : आगामी लोकसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’सह ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राद्वारे मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. आपण कोणाला मतदान केले ते लगेच ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर सात सेकंद मतदारास दिसणार आहे. या यंत्राची प्रात्यक्षिके ग्रामीण तसेच शहरी भागांत करून त्यासंबंधीची व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांनी आज येथे दिले.अश्वनीकुमार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात लोकसभा निवडणूक तयारीसंदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीस सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, एस.एस. बोरकर, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यासह विभागातील आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थिती होते. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या.यावेळी अश्वनीकुमार यांनी निवडणूक प्रक्रिया निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने कटाक्षाने काम करणे आवश्यक असून, आगामी लोकसभा निवडणूक ही ईव्हीएमसह व्हीव्हीपॅट यंत्राद्वारे होणार आहे. मतदारांना पारदर्शक मतदानाचा अनुभव देणाºया या यंत्रामुळे मतदान प्रक्रियेची विश्वासहार्हता वाढणार आहे. त्यामुळे या यंत्राबाबत व्यापक जनजागृती करावी. अचूक व गुणवत्तापूर्ण मतदान होण्यासाठी सर्व पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल, यादृष्टीने मतदार यादी शुद्धीकरण दर्जेदार होण्यास प्राधान्य द्यावे. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी शुद्धीकरण कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला असून, त्यातून अद्ययावत केलेल्या प्राथमिक मतदार याद्यांची तपासणी मतदान केंद्र अधिकारी (बीएलओ) आणि राजकीय पक्षांच्या मतदान केंद्र प्रतिनिधींमार्फत करून सर्वार्थाने निर्दोष मतदार यादी तयार होईल, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना दिल्या.बीएलओंनी घरोघरी जाऊन केलेल्या मतदार नोंदणी प्रक्रियेत त्यावेळी ज्या मतदारांची नोंदणी राहून गेली असेल, त्यांच्या नावांची नोंदणी मतदार यादीत कटाक्षाने करून घ्यावी. उपविभागीय आणि तहसील स्तरावर बीएलओ आणि बीएलए यांच्या बैठका घेऊन मतदार यादी तपासणी लवकरात लवकर करून घ्यावी. मतदान केंद्रांवरील सुविधांबाबत तपासणी करून आवश्यक सुविधांची उपलब्धता होण्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.चौकटमयत मतदारांच्या स्वतंत्र नोंदीमतदारांना ओळखपत्रांचे वाटप झाले आहे का, याची खातरजमा करून घ्यावी. दुबार नोंदणी झालेल्या मतदारांची त्रुटी दूर करणे, मयत आणि कायम स्थलांतरित मतदारांची नोंद ठेवणे, दिव्यांग मतदारांची नोंदणी अधिकाधिक करण्यावर भर देणे, दिव्यांग मतदारांची नावे चिन्हांकित करणे, अयोग्य आणि अस्पष्ट छायाचित्रांची दुरुस्ती करणे आदींचा आढावा घेत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांनी ही कामे काळजीपूर्वक करण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्या.

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद