शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

दत्तात्रेयांनी संत एकनाथांना दर्शन दिले त्या सुलीभंजन पर्वताचा शोध कोणी लावला? जाणून घ्या

By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 14, 2024 18:58 IST

दत्त जयंती विशेष : श्री दत्तात्रेयांनी संत एकनाथांना दर्शन दिले ते ठिकाण

छत्रपती संभाजीनगर : शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांना खुद्द श्री दत्तप्रभूंनी दर्शन दिले, ती तपोभूमी म्हणजे, खुलताबादजवळील ‘सुलीभंजन’ पर्वत होय. दत्त जयंती व नाथषष्ठीच्या दिवशी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. मात्र, काळानुसार विस्मरणात गेलेल्या या पर्वताचा शोध कोणी लावला, हे अनेकांना माहीत नाही.

संत काशीविश्वेश्वर बाबांनी दाखविली दिशासंत वाङ्मयाच्या गाढ्या अभ्यासक व संशोधक डाॅ. कुमुद गोसावी एकनाथ महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करीत होत्या. त्यांना काही प्राचीन ग्रंथात ‘सुलीभंजन’ पर्वताचा उल्लेख आढळला. संत एकनाथ महाराजांचे सदगुरू जनार्दन स्वामी त्यांना तपस्येसाठी तेथे घेऊन जात. कारण तिथे स्वामींचे गुरू म्हणजे प्रत्यक्ष दत्त भगवंतच त्यांना वेगवेगळ्या रूपात येऊन भेटत. शके १४७५ मध्ये श्री दत्तात्रेयांनी एकनाथ महाराजांना मलंग वेशात भेटून अनुग्रह दिला. हा पर्वत नेमका कुठे आहे, याचा शोध डॉ. गोसावी यांनी सुरू केला. १९८३ मध्ये कुमुद गोसावी यांची महान दत्तोपासक काशीविश्वेश्वर बाबा (ज्यांचे आता देवळाई चौकात मंदिर आहे) यांच्याशी भेट झाली. तेव्हा बाबांनी हे स्थान सांगितले.

कुठे आहे सुलीभंजन पर्वत?देवगिरी किल्ल्याकडून खुलताबादकडे जाताना मध्ये बायपास लागतो. तिथून डावीकडे आत ६ कि.मी. अंतरावर ‘सुलीभंजन’ पर्वत आहे. याचा उल्लेख पद्मपुराण, काशीखंड, श्रीदत्तप्रबोध इ. पवित्र ग्रंथांत आहे.

मूळ नाव ‘शूलभंजन’पर्वत‘या स्थानाचे महिमान, नाव ठेविले ‘शूलभंजन’, भंजन म्हणिजे भेदून, प्राणी होतील मुक्त’ याचा अर्थ ‘शूलाचं’ म्हणजे प्रापंचिक व्यथा-वेदना यांचं ‘भंजन’ करणारा- त्यांना भेदून जाणारा हा पर्वत--- ‘शूलभंजन पर्वत’ असे आहे. यास ‘सूर्यभंजन’, ‘सुलीभंजन’, ‘सुलभ पर्वत’ असेही म्हटले जाते. या स्थानाबाबत पुस्तकही मी लिहिले.- डाॅ. कुमुद गोसावी, संत साहित्याच्या गाढ्या अभ्यासक व संशोधक

सुलीभंजन पर्वतावर काय आहे ?१) सुलीभंजन पर्वतावर मंदिर असून गाभाऱ्यात श्री दत्तात्रेय, सद्गुरू जनार्दन स्वामी व संत एकनाथ महाराज यांच्या मूर्ती आहेत.२) परिसरात सूर्यकुंड व चंद्रकुंड आहेत.३) नाथसाधना शिळा आहे (संजीवन शिळा). त्या शिळेवर दगडाने ठोठावले तर सप्तसूर निघतात.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरdatta jayantiदत्त जयंती