शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

इनामी जमिनींचे लाभार्थी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:40 IST

दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत संपादित केलेल्या जमिनीच्या प्रकरणात नेमके काय झाले आहे, त्या जमिनी कुणाला दिल्या आहेत, त्या इनामी जमिनींचे लाभार्थी कोण? अशा अनेक प्रश्नांची चर्चा सध्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) अंतर्गत संपादित केलेल्या जमिनीच्या प्रकरणात नेमके काय झाले आहे, त्या जमिनी कुणाला दिल्या आहेत, त्या इनामी जमिनींचे लाभार्थी कोण? अशा अनेक प्रश्नांची चर्चा सध्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात आहे.त्या वर्ग-२ च्या जमिनी होत्या की, इनामी, खिदमतमास, मदतमास प्रकारातील जमिनी होत्या, याचा पूर्ण तपशील चौकशी समितीने देखील समोर आणलेला नसल्याचे दिसते आहे. २२५ पैकी ११८ प्रकरणांचीच चौकशी झाली. पूर्ण प्रकरणांची चौकशी झाली नाही, असा प्रश्न पुढे येतो आहे.दोन उपजिल्हाधिकाºयांचे निलंबन केल्यामुळे एका प्रकरणातील मुद्दे समोर आणि दुसºया प्रकरणातील मुद्दे दडवून ठेवण्यात चौकशी समितीने देखील न्याय, अन्याय तर केला नाही ना, असा प्रश्न आहे. शिवाय शिफारस करणारे दोषी आणि मंजुरी देणाºयांना अभय देण्याचा प्रकारही झाला आहे. असे असताना जे राजकारणी, बिल्डर, उद्योगपती या जमिनींचे लाभार्थी झाले आहेत. त्यांचे व्यवहार कधी रद्द करणार याबाबत कुणीही बोलण्यास तयार नाही.डीएमआयसींतर्गत संपादित जमिनींच्या प्रक रणात शासनाने ठरवून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार मूल्यांकन केले गेले नाही. तसेच विविध शासन निर्णयानुसार मूल्यांकन न करता परवानगी देण्यात आली. अनर्जित उत्पन्नाच्या रकमेची कमी निश्चिती करण्यात आली आहे.शासन निर्णयानुसार कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. वरकरणी सामान्य लाभार्थी असल्याचे दिसत असले तरी काही प्रकरणांत बिल्डर आणि उद्योजकांना या जमिनी खरेदीच्या परवानग्या देण्यात आल्या आहेत.जिल्हाधिकाºयांमार्फत नोटिसावर्ग-२ जमीन विक्री परवानगी प्रकरणात अपर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, तसेच तत्कालीन सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच गावंडे आणि कटके यांचे निलंबन ही तत्काळ कारवाई असून, त्यांच्या प्रकरणात विभागीय चौकशी करण्यात येईल. गुरुवारी सायंकाळी संबंधितांना नोटिसा जारी केल्या असून, संबंधित अधिकाºयांना नोटिसा बजावण्याबाबत जिल्हाधिकाºयांना सूचना केल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिली.