शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजारांची लाच घेताना आरेखक जेरबंद

By admin | Updated: April 17, 2016 01:35 IST

औरंगाबाद : पेट्रोलपंपाच्या प्रस्तावावर शिफारस करून तो प्रस्ताव मुख्य अभियंत्यांकडे पाठविण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना

औरंगाबाद : पेट्रोलपंपाच्या प्रस्तावावर शिफारस करून तो प्रस्ताव मुख्य अभियंत्यांकडे पाठविण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना मुख्य आरेखक रघुनाथ पदमे (५७, रा. न्यू हनुमाननगर, गल्ली नं. ३, एन-४, पाण्याच्या टाकीजवळ) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी (दि.१६) अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ येथे करण्यात आली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, तक्रारदार यांना इंडियन आॅईल कार्पोरेशन लि. कंपनीकडून पेट्रोलपंप मंजूर झालेला आहे. त्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, औरंगाबाद यांना पाठविण्यात आला. त्यांच्या कार्यालयातील मुख्य आरेखक रघुनाथ पदमे याने या प्रस्तावावर शिफारस करून तो पुढे पाठविण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने १६ एप्रिल रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. पदमे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यावर सार्वजनिक बांधकाम मंडळ, अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला. शनिवारी दुपारी २.४० वाजता रघुनाथ पदमे याला पंचांसमक्ष पाच हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक विवेक सराफ, के. के. शिंदे, कर्मचारी कैलास कामठे, श्रीराम नांदुरे, संदीप आव्हाळे, अश्वलिंग होनराव, अजय आवले, दिलीप राजपूत यांनी केली.