शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजार रुपये लाच घेताना दोन पोलिसांना रंगेहाथ अटक

By admin | Updated: August 10, 2016 00:29 IST

औरंगाबाद : गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी आणि तक्रारदाराच्या मुलाचे नाव वगळण्यासाठी पंधरा हजारांची लाच मागून दहा हजार रुपये रंगेहाथ स्वीकारताना

औरंगाबाद : गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी आणि तक्रारदाराच्या मुलाचे नाव वगळण्यासाठी पंधरा हजारांची लाच मागून दहा हजार रुपये रंगेहाथ स्वीकारताना सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना मंगळवारी सायंकाळी रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिल्लोड येथील एका हॉटेलमध्ये केली.पोलीस कॉन्स्टेबल संदीपान भेरे (बक्कल नंबर ३२४) आणि पोलीस नाईक कॉन्स्टेबल अशोक मोरे(बक्कल नंबर ९६५)अशी अटक करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, तक्रारदार यांच्या घरासमोर दोन मोटारसायकलमध्ये अपघात झाला होता. त्यावेळी तक्रारदाराच्या मुलाने जखमी दिगंबर मोरे यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर मोरे यांनी त्यांचे दीड लाख रुपये तक्र्रारदाराच्या मुलाने चोरून नेल्याची तक्रार सिल्लोड पोलीस ठाण्यात नोंदवली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार भेरे यांच्याकडे होता.या गुन्ह्यात त्यांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या मुलाचे नाव गुन्ह्यातून वगळण्यासाठी भेरे यांनी त्यांच्याकडे पंधरा हजार रुपये लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. आज मंगळवारी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी साध्या वेशात सिल्लोड येथील तौफिक हॉटेल येथे सापळा रचला. तेथे पोलीस कर्मचारी भेरे आणि मोरे हे आले. त्यांनी पंचांसमक्ष तक्रारदाराकडे पंधरा हजार रुपये लाच मागितली. यावेळी तक्रारदाराकडून दहा हजार रुपये घेतले आणि उर्वरित पाच हजार रुपये दोन दिवसांनंतर आणून देण्याचे सांगितले. लाचेची रक्कम त्यांनी घेताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर अधीक्षक ज्ञानेश्वर गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, प्रमोद पाटील, कर्मचारी गोपाल बरंडवाल, अश्वलिंग होनराव, सचिन शिंदे, नितीश घोडके, चालक भारत ठोंबरे यांनी केली.