शिरीष शिंदे , बीडगायींची वाहतूक करणाऱ्या टेम्पो आडवून चालकास मारझोड करुन पोलिसांच्या ताब्यात देणारे गोरक्षण जिल्ह्यात अनेक ठिकाणी आढळून येतात. मात्र, शहरामध्ये मोकाट गायी फिरत असताना त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी वाटत नाही का?, विक्रीसाठी नेली जात असलेली जनावरे भाकड असता अन् शहरात फिरणारी जनावरेही भाकड असतात मग मोकाट जनावरांकडे गोरक्षक दुर्लक्ष का करतात ? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांना पडला आहे. गोरक्षणाच्या नावाखाली काही विशिष्ट जातीच्या लोकांना मारहाण करण्याच्या घटना देशात घडल्या आहेत. त्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजकंठकांनी गोमाताच्या नावाखाली दुकानदारी सुरु केली असल्याचा दावा करत अशा व्यक्तींना फटकारले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील शहरीभागामध्ये मोकाट गुरांची संख्या अधिक असते. त्यात गायींची लक्षणिय संख्या पहावयास मिळते. मोकाट गुरु रस्त्यामधोमध बसत असल्याने वाहनांना अडथळा होत असतो. मोकाट गुरांवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी नगर परिषदेची असते. बीड नगर परिषद मोकाट गुरांना काही कालावधीसाठी कोंडून ठेवतात मात्र सोडून दिल्याने ती जनावरे पुन्हा रस्त्यावरच येतात. त्यामुळे वाहनकोंडीसह वाहन चालकांसमोर मोकाट गुरांची निर्माण झाली आहे. गोहत्या बंदीचा परिणाम ?देशामध्ये गोहत्या बंदीचा कायदा लागू झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्याकडील निरुपयोगी गायीयांच्यासह भाकड जनावरे सोडून देण्याशिवाय पर्याय उरत नाही. परिणामी, सोडून दिलेली जनावर शहराकडे वळतात. एकास एक जनावर जोडत मोकाट गुरांचा झुंड तयार होतो व तो रस्त्याच्याकडेने दिवसभर मुख्य मार्गासह इतर भागात फिरताना पहावयास मिळतात. भाजी मंडई, जालना रोड, सावतामाळी चौक, बस स्थानक परिसर, बशिर गंज, सुभाष रोड या प्रमुख भागात दिसून येतात असे नाही तर शाहू नगर, शिंदे नगर, धानोरा रोड, पंचशील नगर या मार्गावरील रस्त्यावरही मोकाट जनावरे दिसून येतात.
गोरक्षण करणारे गेले कोठे ?
By admin | Updated: August 8, 2016 00:43 IST