शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

ंकर्जमाफीची योग्य वेळ येणार तरी कधी?

By admin | Updated: April 2, 2017 23:39 IST

उस्मानाबाद :आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची हे सरकार वाट बघत आहेत? असा खडा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.

उस्मानाबाद : सलग चार वर्षे दुष्काळाशी दोनहात केल्यानंतर गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला. शेतमालही चांगला पिकला; मात्र बाजारपेठेत दाखल होताच दर घसरले. त्यामुळे पीक चांगले येऊनही हा व्यवसाय आतबट्ट्याचा ठरला. त्यामुळे साधा उत्पादन खर्चही हाती न लागल्याने आर्थिक परिस्थिती सुधारली नाही. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफीशिवाय दुसरा पर्याय नाही. याच मागणीसाठी विधिमंडळात संवैधानिक मार्गाने लढा दिल्यानंतर शासनाकडून ‘योग्य वेळी कर्जमाफी देऊ’ असे सांगण्यात येत आहे. मात्र ही योग्य वेळ येणार तरी कधी? आणखी किती शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची हे सरकार वाट बघत आहेत? असा खडा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला.चंद्रपूर येथून सुरू झालेल्या संघर्ष यात्रेचे रविवारी दुपारी जिल्ह्यात आगमन होताच तालुक्यातील बेंबळी येथे शेतकऱ्यांनी सर्वांचे स्वागत केले. यानंतर उस्मानाबाद येथे आयोजित सभेत ते बोलत होते. मंचावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे, समाजवादी पार्टीचे अबु आझमी, आ. जितेंद्र आव्हाड, दिलीप सोपल, राणाजगजितसिंह पाटील, पतंगराव कदम, विद्या चव्हाण, भारत भालके, राहुल मोटे, विक्रम काळे, शेकापचे भाई धनंजय पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील आदी उपस्थित होते. खा. चव्हाण म्हणाले की, भाजपा सरकार केवळ घोषणा करण्यात पटाईत आहेत. मागील अडीच वर्षात केलेल्या घोषणा पाहिल्या असता अंमलबजावणीच्या नावाने बोंबाबोंब असल्याचे दिसून येते. एकीकडे शेतकरी हिताच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे पीकविम्यातून कर्जाची रक्कम कपात करण्याचे आदेश काढायचे. अशा प्रकारे दुटप्पी भूमिका असणाऱ्या शासनाकडून मदतीची अपेक्षा बाळगणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे आता बघ्याची भूमिका घेण्यापेक्षा सर्वांनी संघर्ष करण्याची गरज आहे. त्याखेरीज शेती आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. मतदान यंत्राच्या चुकीमुळे हे सत्तेवर आले आहेत. त्याची निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार करणार असल्याचे खा. चव्हाण यांनी सांगितले. येथील सभेनंतर ही यात्रा तुळजाभवानीचे दर्शन घेऊन सोलापूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. या सभेसाठी जिल्हाभरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘जलयुक्तमध्ये प्रचंड भ्रष्टाचार’मुख्यमंत्र्यांसह भाजपाचे सर्वच मंत्री जलयुक्त शिवार योजनेचे गोडवे गात आहेत. मात्र ही योजना राबविताना कुठलेही निकष पाळले जात नसून, प्रचंड भ्रष्टाचार होत आहे. गोरगरिबांचे पैसे कंत्राटदारांच्या घशात घालण्याचे काम सध्या सुरू असल्याचा आरोप खासदार अशोक चव्हाण यांनी केला. (प्रतिनिधी)