शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मी कर्जमाफीचा लाभार्थी होणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:55 IST

त्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र मोजक्याच शेतक-यांची नावे ग्रीन यादीत दिसत आहेत. मात्र, पिवळ्या (येलो) आणि लाल (रेड) यादीतील नावे शोधायची कुठे हा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीस पात्र मोजक्याच शेतक-यांची नावे ग्रीन यादीत दिसत आहेत. मात्र, पिवळ्या (येलो) आणि लाल (रेड) यादीतील नावे शोधायची कुठे हा प्रश्न शेतक-यांना पडला आहे. बँकेतही योग्य माहिती मिळत नसल्याने कर्जमाफीचा हा गोंधळ किती दिवस सुरु राहणार, असा सवाल शेतक-यांना उपस्थित केला जात आहे. एकूणच मी कर्जमाफीचा लाभार्थी होणार तरी कधी, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे.कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील दोन लाख पंधरा हजार कुटुंबातील तीन लाख ९७ हजार शेतक-यांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. बँकांनाही आपल्याकडील कृषी कर्जदार शेतक-यांची संपूर्ण आॅनलाईन भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी तीन लाख १२ हजार शेतक-यांची माहिती आॅनलाईन भरली. त्यानुसार ग्रीन यादीत कर्जमाफीस तात्पुरते पात्र, येलो यादीत अर्ज भरताना कागदपत्रातील त्रुटींमुळे प्रलंबित शेतकºयांची नावे, तर रेड यादीत कर्जमाफीस तात्पुरते अपात्र शेतकºयांची नावे असतील, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र, येलो आणि रेड यादी ‘आपले सरकार’च्या वेबपोर्टलवर, तालुका समिती किंवा बँकेत कुठेच पाहायला उपलब्ध नाही. त्यामुळे काही कर्जमाफीस पात्र होण्यासाठी कमी असलेली कागदपत्रे कोणती, ती पाहायची कुठे, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. कर्जदार शेतकरी संबंधित बँकेत गेल्यानंतर आमच्याकडे कर्जमाफीबाबत कुठलीच माहिती नाही, सर्व याद्या वरिष्ठ कार्यालयाकडून येणार असल्याचे उत्तर शेतकºयांना मिळत आहे. विशेष म्हणजे कर्जमाफीच्या संपूर्ण प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी स्थापन केलेल्या तालुकानिहाय समित्यांच्या कामकाजाबाबत कुणालाच माहिती नाही. पात्र शेतक-यांची माहिती गावनिहाय देण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप एकाही गावात तालुका समितीचे सदस्य किंवा बँक प्रतिनिधी गेलेले नाही. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळणार तरी कधी, असा संतप्त सवाल शेतक-यांतून उपस्थित केला जात आहे. आतापर्यंत ज्या बँकांना पात्र शेतक-यांसाठी कर्जमाफीची रक्कम मिळाली आहे. ती किती शेतक-यांच्या खात्यावर वर्ग झाली. यात राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेतलेल्या शेतक-यांची संख्या किती आहे. याची अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाकडेही उपलब्ध नाही. दरम्यान, सर्व पात्र शेतक-यांची यादी एकाच वेळी जाहीर करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरू असून, बँकेच्या वरिष्ठ अधिका-यांना याबाबत सूचना देण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक एन. व्ही. आघाव यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.