शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

फुले मार्केट कधी होणार?

By admin | Updated: April 4, 2016 00:38 IST

जालना : शहरातील केंद्रस्थानी असलेल्या महात्मा फुले मार्केट पुनर्बांधणीची प्रक्रिया कधी पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

जालना : शहरातील केंद्रस्थानी असलेल्या महात्मा फुले मार्केट पुनर्बांधणीची प्रक्रिया कधी पूर्ण होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. गत पाच वर्षांपूर्वी धोकादायक इमारत पाडून त्या जागी उत्कृष्ट व्यापारी संकुल उभारण्याचे स्वप्न पालिकेने दाखविले होते. प्रत्यक्षात हे स्वप्न अद्यापही कागदावरच आहे. पाच वर्षांनंतरही साधी निविदा पूर्ण करण्याचे धाडसही पालिकेने दाखविले नाही. जुनी इमारत पाडल्याने अनेक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. चालू व्यवसाय बंद करावा लागला. काहींना नवीन दुकाने खरेदी करावी लागली. व्यापाऱ्यांचे हाल होत असले तरी पालिका लालफितीचा कारभार सोडण्यास तयार नाही. विशेष म्हणजे दोनदा निविदा काढूनही उपयोग झालेला नाही. सिंधी बाजार परिसरात दोनशेपेक्षा अधिक दुकाने असलेली महात्मा फुले मार्केटच्या इमारतीस साठ वर्षे झाले होते. ही इमारत जीर्ण झाल्याने ती कोसळण्याचा धोका होता. व्यापारी व पालिका यांच्यातील दीर्घ चर्चेनंतर पाच वर्षांपूर्वी ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली. इमारत तयार न झाल्याने पालिकेला मिळणारे वार्षिक उत्पन्नही बुडत आहे. या उत्पन्नातून पालिका शहर विकास साधू शकते. राजकीय आणि प्रशासकीय वादात हा मुद्दा रखडत आहे. सदर इमारतीच्या बांधकामासाठी ई-टेंडर निघणार आहे. पाच मजल्यांची ही नवीन इमारत असेल असे सांगितले जाते. सुमारे २८ ते ३० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया असेल असा अंदाज नगरपालिकेतील सूत्र व्यक्त करतात. जून व जुलै २०१५ या महिन्यात यासाठी निविदा काढण्यात आल्या. मात्र दोन्ही वेळेस कंत्राटदाराचा प्रतिसाद मिळाला नाही.आज रोजी दीड एकरचा हा परिसर आहे. या परिसरात पाच मजली सुसज्ज मार्केट असेल. यातून २८३ दुकाने निघतील असा पालिकेतील बांधकाम तज्ज्ञांचा अंदाज आहे. यातील काही दुकाने व्यापाऱ्यांना द्यावी लागणार आहेत. त्यामुळे व्यापाऱांना किती, कंत्राटदराचा हिस्सा किती, वाहनतळाची व्यवस्था काय आदी विविध मुद्यांवरून ही निविदा प्रक्रिया दर वेळेस रखडत आहे. शहरातील मध्यभागी ही जागा आहे. पालिकेच्या दुर्लक्षामुळे काही जागेवर उकिरडा तर काही ठिकाणी छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आपले बस्तान मांडले आहे. छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांकडून किती रक्कम घेतली जाते हा संशोधनाचा विषय आहे. एकूणच या जागेवर सुसज्ज इमारत कधी उभारणार असा प्रश्न व्यापाऱ्यांसोबतच नागरिकांनाही पडला आहे.काही दिवसांपूर्वी मुंबईत मुले मार्केटच्या विकासा संदर्भात चर्चा झाली होती. परंतु ही चर्चा चर्चाच राहिली. यातून काहीच निष्कर्ष निघू शकला नाही. पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही.