शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन यादीत नाव कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील किती शेतक-यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला, ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील किती शेतक-यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला, याची एकत्रित आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही. राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जदार शेतकºयांची माहिती प्रशासनाकडे नसल्याने या बँकांचे कर्जदार शेतकरी रोज बँकेत चकरा मारत आहेत, तर बँकांकडे पात्र शेतकºयांची कुठलीच माहिती नसल्याने कर्जमाफीच्या ग्रीन यादीत नाव येणार तरी कधी, असा प्रश्न शेतक-यांमधून उपस्थित केला जात आहे.राष्ट्रीयीकृत बँकांनी आपल्या कर्जदार शेतक-यांची माहिती मुख्य कार्यालयामार्फत आपले सरकार पोर्टलवर आॅनलाईन भरली आहे. शेतक-यांनी कर्जमाफीसाठी भरलेला अर्ज व बँकांनी भरलेली माहिती याचे संगणकीकृत वर्गीकरण करून पात्र शेतकºयांची ग्रीन यादी तयार होणार आहे. सदर यादी आॅनलाईन अपडेट झाल्यानंतर पात्र शेतक-यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत. मात्र, कर्जमाफीची यादी तयार करताना रोज नवीन बदल केले जात आहेत. त्यामुळे आतापर्यंत मोजक्याच शेतक-यांची नावे ग्रीन यादीत आली आहेत.जालना तालुक्यातील गोंदेगाव व वंजारउम्रद येथील एका तर मजरेवाडी येथील दहा शेतक-यांची नावे पात्र यादीत दिसत आहेत. अशाच प्रकारे बहुतांश गावांमध्ये तीन, चार दहा शेतक-यांची नावे पात्र यादीत दिसत आहेत. काही गावांमधील एकही शेतक-याचे नाव ग्रीन यादीत नाही. नेमकी कुठली कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे पात्र यादीत नाव आले नाही, याबाबत विचारणा करण्याची सोय कुठेच नसल्याने चिंता वाढली आहे. आता राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्जदार असलेल्या पात्र शेतकºयांची नावे थेट बँकेत येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक एन. व्ही. आघाव यांनी सांगितले. एकूणच कर्जमाफीची प्रक्रिया नेमकी कशी राबवणार, पात्र शेतक-याचे नाव यादीत कधी येणार याबाबत कुठलीही निश्चित माहिती नाही.