शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

हरवलेला अलीम नऊ वर्षांनंतर परततो तेव्हा...

By admin | Updated: July 3, 2017 23:52 IST

जालना : वडिलांनी रागावले म्हणून रागाच्या भरात तो नऊ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला... रेल्वेने थेट आग्रा गाठले...

बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वडिलांनी रागावले म्हणून रागाच्या भरात तो नऊ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला... रेल्वेने थेट आग्रा गाठले...तिथे मिळेल ते काम करु लागला...पण आईवडिलांची आठवण त्याला स्वस्थ बसू देईना... अखेर रमजान ईदला त्याने नऊवर्षांपूर्वी त्याच्याजवळ असलेल्या मोबाईल क्रमाकांवरुन वडिलांशी संपर्क साधला आणि मुलाचा शोध घेऊन थकलेल्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. रमजानमध्ये केलेल्या उपवासाचे फळ मिळाल्याची भावना जालन्यातील शेख अब्दुल कुटुंबायांनी सोमवारी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.जुन्या जालन्यातील देहेडकरवाडी परिसरातील शिशटेकडी भागात राहणारा अब्दुल अलीम अब्दुल खय्यूम शेख २९ डिसेंबर २००९ मध्ये वडील रागावले म्हणून घरातून निघून गेला. जालना रेल्वेस्थानकातून तो औरंगाबादला पोचला आणि तेथून एका रेल्वेत बसून थेट आग्रा येथे पोचला. अनेक दिवस इकडे तिकडे भटकंती केली. पोटासाठी मिळेल ते काम केले. त्यानंतर आग्रा येथील त्रिमूर्ती सिमेंट कंपनीत काम करू लागला आणि मित्रांसोबत तिथेच रमला. इकडे मुलाच्या शोध घेण्यासाठी शेख खय्यूम कुटुंबीयांनी औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक, मनमाड, अजमेर, हैदराबाद, दिल्ली पालथी घातली. मात्र, मुलगा अलीम काही सापडला नाही. पोलिसांकडे चकरा मारून थकलेल्या शेख कुटुंबीयांनी मुलगा सापडेल, ही आशाच सोडली. दरम्यान, तिकडे अब्दुल अलीम सोबत सिमेंट कंपनीत काम करणारे हिंदू समाजाचे मित्र खास त्याच्यासाठी ईद साजरी करायचे. यंदाच्या ईदला त्यांनी अलीमला वडिलांना फोन करण्याचा आग्रह धरला. अलीमने शुक्रवारी वडिलांच्या जुन्या क्रमांकावर संपर्क केला. आवाज परिचयाचा वाटल्यानंतर अब्दुल खय्यूम यांनी अधिक चौकशी केली. मुलाने सर्व हकीकत सांगताच अब्दुल खय्यूम यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांनी संपूर्ण पत्ता घेऊन नातेवाइकांसह आग्रा गाठले. सोमवारी सर्वजण अलीमला घेऊन जालन्यात पोहोचले.