परिसरात खरिपात पावसाने पिकांचे नुकसान झाले. चांगल्या पावसाने रबीची पिके चांगली होण्याची आशा होती. मात्र, पिकांवर नैसर्गिक संकटाची मालिका मात्र संपायला तयार नाही. गेल्या काही दिवसांपासून सतत बदलत वातावरण निर्माण होत असल्याने रबीतील पिकेही अडचणीत येऊ लागली आहेत. परिसरात ज्वारी, मका, हरभरा, पेरणी झाली. मात्र, पोषक वातावरण नसल्याने पिके अडचणीत येऊ लागली आहेत. पिकांना पोषक असलेली थंडी गेल्या आठवड्यापासून गायब झाल्याने व पहाटेच्या वेळी धुके पडू लागल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
----------------
फोटो : गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.