शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

झालर क्षेत्राचे आता काय होणार?

By admin | Updated: December 11, 2014 00:47 IST

औरंगाबाद : सिडकोने या योजनेतून अंग काढून घेतल्याने आता या गावांचा विकास करण्यासाठी कोणती संस्था जबाबदारी घेते, याकडे परिसरातील ग्रामस्थांबरोबरच बिल्डरांचेही लक्ष लागले आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद परिसरातील २८ गावांचा योजनाबद्ध विकास करण्यासाठी नेमण्यात आलेली प्राधिकृत संस्था सिडकोने या योजनेतून अंग काढून घेतल्याने आता या गावांचा विकास करण्यासाठी कोणती संस्था जबाबदारी घेते, याकडे परिसरातील ग्रामस्थांबरोबरच बिल्डरांचेही लक्ष लागले आहे. झालर क्षेत्राच्या विकासासाठी शासनाने नियुक्त केलेल्या व स्पेशल प्लॅनिंग अ‍ॅथॉरिटी असलेल्या सिडकोने २८ गावांचा विकास आराखडाही तयार केला आहे. तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. २००६ साली सिडकोकडे झालर क्षेत्राच्या विकासाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर आठ वर्षांत दोन आराखडे सादर करण्यापलीकडे सिडकोला फार काही करता आले नाही. आता मात्र सिडकोने झालर क्षेत्रातून अंग काढून घेतल्याने आता विकासाचा हा मार्ग खडतर झाला आहे. सातारा आणि देवळाई या दोन गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद झाल्याने तेथील नागरिकांचा प्रश्न सुटला आहे; मात्र आणखी २६ गावे यामध्ये अडकली आहेत. सिडकोने २८ गावांच्या विकासासाठी पाच झोन तयार करून त्याच्या विकासाचा आराखडा तयार केला होता. सातारा आणि देवळाईसाठी स्वतंत्र झोन होते. आता केवळ चार झोनअंतर्गत २६ गावे आहेत. यापैकी झोन ३ मध्ये येत असलेल्या पिसादेवी, गोपालपूर, साजापूर, कच्चेघाटी, हिरापूर आदी गावांमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने जागा घेऊन ठेवल्या आहेत. त्याचबरोबर झोन ४ मधील सुंदरवाडी, झाल्टा, गांधेली आणि बाळापूर या बीड बायपास रस्त्यावरील गावांमध्ये सध्याच मोठ्या संख्येने बांधकाम व्यावसायिक घुसले आहेत. याठिकाणी नागरी वसाहती होण्याचे प्रमाण वाढत आहे. झोन २ मधील सावंगी परिसरातही मोठमोठे अपार्टमेंट उभे राहण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे भविष्यात नागरी सुविधांचा प्रश्न निर्माण होणार आहे. २८ गावांमध्ये एक व्यावसायिक संस्था म्हणून सिडकोने प्लॅन केला आहे. काही तक्रारी वगळल्या तरीही सिडकोने भविष्याचा वेध घेत सुविधांचे जाळे निर्माण करण्याचे नियोजन केले आहे. (समाप्त)