शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

सरकारचे करायचे काय? ...खाली मुंडके वर पाय, शिवसेना महिला आघाडीतर्फे सरकारच्या विरोधात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 18:00 IST

औरंगाबाद, दि. २ : ‘केंद्र, राज्य सरकारचे करायचे काय?... खाली मुंडके वर पाय’, ‘सरकारला लागली बुलेट ट्रेनची आस...शेतक-यांच्या गळ्यात ...

औरंगाबाद, दि. २ : ‘केंद्र, राज्य सरकारचे करायचे काय?... खाली मुंडके वर पाय’, ‘सरकारला लागली बुलेट ट्रेनची आस...शेतक-यांच्या गळ्यात पडलाय फास’, ‘महागाईने पसरले पाय जनतेने करायचे काय?’...अशा विविध घोषणांनी क्रांती चौक परिसर दणाणला. निमित्त होते शिवसेना महिला आघाडीतर्फे स्वपक्षीय सरकार विरोधात महागाई दर कमी आणि जीएसटी रद्द करण्यासाठी निदर्शने.

केंद्र आणि राज्य सरकारामध्ये सहभागी असलेल्या शिवसेना महिला आघाडीतर्फे मुंबई, ठाणे, नाशिक, पुणेनंतर औरंगाबादेत महागाई, जीएसटी विरोधात निदर्शने केली. या निदर्शनाचे नेतृत्व करण्यासाठी शिवसेना प्रवक्त्या व संपर्कप्रमुख डॉ. मनिषा कायंदे मुंबईहून आल्या होत्या. दुपारी १२ वाजता क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर भगवा ध्वज फडकावून आंदोलनाला सुरूवात झाली. हे आंदोलन दोन तास सुरू होते. यावेळी बोलताना डॉ. कायंदे म्हणाल्या, मागील काही दिवसात पेट्रोल, डिझेलच्या किंमती प्रतिलिटर तब्बल ८ ते १० रूपयांनी वाढल्या. घरगुती गॅस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला. इतर दैनंदिन वापराच्या वस्तूही महागल्या आहेत. तरीही सरकार या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणतीही पावले उचलत नाही. यासाठी शिवसेना सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करत असल्याचे डॉ. कायंदे यांनी सांगितले.

क्रांतीचौकात चुलीवर भाकरी भाजून गॅसदरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी महिला आघाडीच्या पदाधिका-यांनी भाक-या भाजल्या. यानंतर सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. जीएसटीच्या करांमुळे सर्वसमान्य नागरिक, व्यावसायीक घाईकुतीला आला असल्यामुळे हा कर रद्द करण्याची मागणीही यावेळी केली. या आंदोलनात उपमहापौर स्मिता घोगरे, महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क संघटक कला ओझा, जिल्हा संघटक रंजना कुलकर्णी, नगरसेविका सुमित्रा हाळनोर, सीमा खरात, शिल्पा वाडकर, सीमा चक्रनारायण, ज्योती पिंजरकर, संगिता लोखंडे, आशा भालेराव, सुनिता आऊलवार, अंजली मांडवकर, प्र्रतिभा जगताप, प्राजक्ता राजपुत, आशा दातार, विद्या अग्नीहोत्री, दुर्गा भाटी, रेखा वैष्णव, जयश्री घाडगे, सुलभा भोपळे, उज्वला बिरारी यांच्यासह  उपशहर, विभाग, शाखा संघटक, गटप्रमुख महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पुरुष पदाधिका-यांची बॅकीगशिवसेना महिला आघाडीच्या आंदोलनामध्ये पुरूष पदाधिकाºयांनी थेट सहभाग नोंदवला नाही. मात्र जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महानगरप्रमुख प्रदिप जैस्वाल, शहरप्रमुख राजू वैद्य, बंडू ओक आदी पदाधिका-यांनी पाठीमागे राहून आंदोलनासाठी महिलांना प्रोत्साहन दिले.