शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या राजकारणात शिरले ‘पश्चिमी’ वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:43 IST

शिवसेनेने महापालिकेतील दोन महत्त्वाच्या पदांवर एकाच मतदारसंघातील नगरसेवकांना विराजमान केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शिवसेनेने महापालिकेतील दोन महत्त्वाच्या पदांवर एकाच मतदारसंघातील नगरसेवकांना विराजमान केले आहे. तर सभापती हे पददेखील त्या मतदारसंघातीलच असल्यामुळे मनपाच्या राजकारणात पश्चिमी वारे वाहू लागले आहे. या सगळ्या प्रकारामुळे शिवसेनेत खदखद निर्माण होऊ पाहत आहे.महापौरपदावर नंदकुमार घोडेले यांना संधी देण्यात आली, ते पश्चिम मतदारसंघातील ईटखेडा वॉर्डाचे नगरसेवक आहेत. सभागृह नेतेपदी विकास जैन यांना संधी मिळाली ते वेदांतनगरचे प्रतिनिधित्व करतात. तर सभापती गजानन बारवाल हे भाजप पुरस्कृत असले तरी ते बन्सीलालनगर भागात राहतात. माजी महापौर त्र्यंबक तुपे, माजी सभापती दिलीप थोरात, माजी सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, माजी उपमहापौर स्मिता घोगरे हे सगळे पश्चिम मतदारसंघातीलच होते. माजी महापौर भगवान घडामोडे हे फक्त अपवाद राहिले.मनपातील ही सर्व पदे एकाच मतदारसंघात गेल्यामुळे राजकीय अस्थैर्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. फुलंब्री, मध्य आणि पूर्व मतदारसंघ शिवसेनेला नको आहेत काय, असाच संदेश यातून जातो आहे. पश्चिम मतदारसंघात भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याला शह देण्यासाठी सेनेने पश्चिम मतदारसंघ ताब्यात राहण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री रामदास कदम यांच्या गटाला दणका देण्यासाठीदेखील खा.चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आ.संजय शिरसाट यांनी मोट बांधल्याचे दिसते. महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या धामधुमीत पालकमंत्र्यांच्या मागे-पुढे फिरणारा गट पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आला होता.शिवसेनेच्या गटनेत्याला मनपात केबिन नाही. त्यामुळे पूर्व मतदारसंघातील गटनेते मकरंद कुलकर्णी यांना केबिन देण्याचे आदेश पक्षनेत्यांनी दिले आहेत. भाजपच्या गटनेत्याला केबिन आहे, मग शिवसेनेच्या गटनेत्याला का नाही. यावर दोन दिवसांपूर्वी सुभेदारीत चर्चा झाली होती.