शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘गिरिजा’तील विहिरींना लागले मुबलक पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:12 IST

गिरिजा प्रकल्पातील चार विहिरींचे पाणी कमी झाल्याने खुलताबाद शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने गिरिजा नदीत तातडीने तीन बुडकी विहिरी खोदल्या असून त्यांना मुबलक पाणी लागल्याने खुलताबादकरांचा पाणीप्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद : गिरिजा प्रकल्पातील चार विहिरींचे पाणी कमी झाल्याने खुलताबाद शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने गिरिजा नदीत तातडीने तीन बुडकी विहिरी खोदल्या असून त्यांना मुबलक पाणी लागल्याने खुलताबादकरांचा पाणीप्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार आहे.खुलताबाद शहराला तालुक्यातील येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने प्रकल्पात जेमतेम पाणी जमा झाले.परंतु सदरील प्रकल्प नोव्हेंबरमध्येच कोरडाठाक पडल्याने गिरिजा मध्यम प्रकल्पातील नगर परिषदेच्या चार विहिरींचे पाणी एकत्र करून चार दिवसाआड खुलताबादकरांना पाणीपुरवठा करण्यात येत होता.परंतु या विहिरींचे पाणी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच तळाला गेल्याने शहरवासियांना गेल्या १५ दिवसांपासून ६ ते ७ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली.नगर परिषदेने तातडीने गिरिजा मध्यम प्रकल्पात तीन बुडकी विहिरी (चर) खोदण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेतला.या तिन्ही विहिरींना मुबलक पाणी लागल्याने जुन्या चार व नवीन बुडकी तीन विहिरींचे पाणी एकत्र करून खुलताबादकरांची तहान भागविली जाणार आहे. मार्च - एप्रिलमध्ये परत एकदा पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करावी लागणार आहे.खुलताबाद शहरात काही भागात मोठ्या प्रमाणावर पाणी असलेले हातपंप नादुरूस्त असून सदरील हातपंप दुरूस्त केल्यास पाणीप्रश्न मार्गी लागू शकतो. परंतु नगर परिषद हातपंप दुरूस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती लागत आहे.नगर परिषदेने तीन नवीन बुडकी विहिरी खोदल्या असून हे काम सुरूच असून त्यास मुबलक लागले आहे. तर एका जुन्या विहिरीचे दुरूस्तीचे कामही हाती घेतल्याने या सर्व दुरूस्तीस किमान पंधरा दिवस लागणार आहेत.