शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

स्मार्ट सिटी बस प्रवाशांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:03 IST

बससेवेच्या दुस‍ऱ्या वर्धापन दिनानिमित्त एएससीडीसीएल बस विभागाने औरंगपुरा, सिडको, महावीर चौक, रेल्वे स्टेशन आणि रांजणगाव येथे नागरिकांशी संवाद साधला. ...

बससेवेच्या दुस‍ऱ्या वर्धापन दिनानिमित्त एएससीडीसीएल बस विभागाने औरंगपुरा, सिडको, महावीर चौक, रेल्वे स्टेशन आणि रांजणगाव येथे नागरिकांशी संवाद साधला. याशिवाय स्मार्ट सिटी बस विभागातर्फे मुकुंदवाडी बस डेपो येथे शहर बसचे चालक, वाहक आणि मेकॅनिकसाठी कार्यशाळा घेण्यात आली. कॉर्पोरेट प्रशिक्षक नदीम पाशा यांनी कर्मचाऱ्यांना प्रवासी सुरक्षा व सहकार्याचे महत्त्व पटवून दिले. स्मार्ट सिटी बस विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत भुसारी, उपव्यवस्थापक ललित ओस्तवाल, विशाल खिल्लारे, सिध्दार्थ बनसोड, विलास काटकर, डी. आर. रावते, माणिक निला उपस्थित होते.

२४ हजार रुपये दंड वसूल

औरंगाबाद : महापालिकेने नेमलेल्या नागरी मित्र पथकाने शनिवारी २४ हजार २५० रुपये दंड वसूल केला. मास्क न वापरणे, रस्त्यावर कचरा, कॅरिबॅगचा वापर आदी कारणांसाठी दंड आकारण्यात येत आहे.

महापालिका मुख्यालयात रंगरंगोटीचे काम

औरंगाबाद : प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रशासनाने शनिवारपासूनच जोरदार तयारी सुरू केली असून, किरकोळ दुरुस्ती, रंगरंगोटी, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.

सिडको-हडकोतील पाणीपुरवठा पूर्ववत

औरंगाबाद : महावितरण कंपनीने शुक्रवारी सिडको हडको भागात दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा केंद्रांवर दिवसभर वीजपुरवठा खंडित झाला होता. शनिवारी विविध वसाहतींना पाणी देण्याचे काम सुरळीतपणे सुरू झाल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली.

टँकरच्या मागणीत हळूहळू वाढ

औरंगाबाद : शहरातील दोनशेपेक्षा अधिक वसाहतीमध्ये महापालिकेने जलवाहिन्या टाकलेल्या नाहीत. अनेक वर्षांपासून या वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. थंडी संपताच पाण्याच्या मागणीत हळूहळू वाढ होत आहे. महापालिकेला टँकरची संख्या वाढवावी लागणार आहे.

कचरा दोन दिवस पडून राहतो

औरंगाबाद : कचरा संकलनासाठी महापालिकेने रेड्डी कंपनीची नियुक्ती केली आहे. कंपनीच्या रिक्षा काही वसाहतींमध्ये दोन ते तीन दिवस कचरा उचलण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे नागरिकांना कचरा बाहेर आणून टाकावा लागतो. अनेक ठिकाणी कंपनीकडून डोअर टू डोअर कलेक्शन होत नाही.

कटकट गेट येथील रस्त्याची अवस्था वाईट

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ऐतिहासिक कटकट गेटची डागडुजी करण्यात येत आहे. गेटच्या आजूबाजूला असलेल्या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था आहे. दुचाकी चारचाकी वाहनधारकांना या ठिकाणी प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.

पावसाच्या पाण्याचा निचरा होणारच नाही

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १५२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधी अंतर्गत सावरकर चौक ते सिल्लेखाना रस्त्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा म्हणून सुरू असलेले काम अतिशय चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. रस्ता एकीकडे आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याचे ठिकाण दुसरीकडे अशी परिस्थिती आहे.