शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

१२ किलोचा जिवंत तोफगोळा

By admin | Updated: September 4, 2015 00:39 IST

नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी परिसरातील एका पुरातन विहिरीत तब्बल १२ किलो वजनाचा जिवंत तोफगोळा आढळल्याने एकच खळबळ उडाली

नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी परिसरातील एका पुरातन विहिरीत तब्बल १२ किलो वजनाचा जिवंत तोफगोळा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे़ घटनास्थळी दाखल झालेल्या बॉम्ब शोधक-नाशक पथकाने धाव घेवून सदरील तोफगोळा ताब्यात घेतला आहे़ तो ५० टक्क्याहून अधिक जिवंत असल्याचा अंदाज असून, विहिरीत इतर स्फोटके आहेत का ? याची तपासणी करण्यात येत आहे़नळदुर्ग शहरापासून सहा किलोमीटर अंतरावरील खुदावाडी शिवारात शरद गणपतराव नरवडे यांची सर्वे नंबर १६९ मध्ये शेती आहे़ या शेतातील जुन्या विहिरीतील गाळ काढण्याचे काम गुरूवारी सुरू होते़ गाळ काढताना दुपारच्या सुमारास ९ इंच लांबीचा व ३ इंच व्यासाचा १२ किलोचा तोफगोळा दिसून आला़ प्रारंभी बॉम्ब असल्याच्या अफवेने खुदावाडीसह परिसरात मोठी खळबळ उडाली होती़ घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सपोनि फुलचंद मेंगडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळाकडे धाव घेतली़ तोफगोळ्याची पाहणी केल्यानंतर वरिष्ठांशी संपर्क साधून बॉम्ब शोधक-नाशक पथकाला पाचरण केले़ दुपारी ४़३० वाजण्याच्या सुमारास दाखल झालेल्या पथकाने श्वानासह परिसराची पाहणी केली़ तोफगोळ्याची हाताळणी केली असता तो जिवंत असल्याचे दिसून आले़ जिवंत तोफगोळा असल्याचे समजताच महसूलचे नायब तहसीलदार माणिक चव्हाण, मंडळ अधिकारी गांदले यांनी धाव घेवून पंचनामा केला़ दरम्यान, या तोफगोळ्याचा स्फोट झाला असता तर साधारणत: अर्धा किलोमीटर अंतरावर मोठे नुकसान झाले असते, असा तज्ञांचा अंदाज आहे़ तर हा तोफगोळा कोणाच्या तरी हाती लागल्यानंतर या विहिरीत आणून टाकल्याची चर्चाही रंगली आहे़ नळदुर्ग येथील निजामकालीन किल्ल्यातून शत्रूवर त्या काळात तोफेतून हल्ला करण्यात आल्यानंतर न फुटलेला हा तोफगोळा असावा, असा कयास लावला जात आहे़ या तोफगोळ्यात जवळपास पाच ते सहा किलोचे स्फोटके असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे़नागरिकांनी घाबरू नयेयाबाबत बोलताना सपोनि एस़डी़पठाण म्हणाले, तोफगोळ्याबाबत नागरिकांनी घाबरून जाण्यासारखे नाही़ ६०० ते ८०० मीटर वेगाची वस्तू आदळली तरच याचा स्फोट होवू शकतो़ त्याची हाताळणी बॉम्ब शोधक-नाशक पथकाने केली असून, त्याचा स्फोट होणार नाही, असेही पठाण म्हणाले़गाळ काढण्यास प्रतिबंधसपोनि फुलचंद मेंगडे म्हणाले, महसूल विभागाच्या परवानगीने सापडलेला तोफगोळा सदृश्य वस्तू बॉम्ब शोधक-नाशक पथकाच्या ताब्यात देण्यात आली आहे़ त्या विहिरीत इतर काही स्फोटके आहेत का ? याची तपासणी केली जात असून, काही काळापुरते गाळ उपसा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे़