शासकीय कला महाविद्यालयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आणि प्रा. वामन चिंचोळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त शाकम कनेक्टतर्फे प्रिंट मेकिंग चित्रप्रदर्शन, शाकमच्या वेबसाइटचे उद्घाटन आणि माजी विद्यार्थी संपर्क कक्षाचे उद्घाटन दि. ३० रोजी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. अनंत निकम, प्रा. डॉ. गणेश तरतरे यांची यावेळी उपस्थिती होती.
निकम यांनी लीनोचे प्रात्यक्षिक करून दाखविले आणि विजय कुलकर्णी, दिलीप बडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत माजी विद्यार्थ्यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले.
महाविद्यालयाच्या दुरुस्तीसाठी शासनातर्फे जी मदत लागेल, त्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन आमदार दानवे यांनी दिले आणि प्रशासनासोबत कलावंतांनीही यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. किशोर निकम यांनी संचालन केले. विजया पातूरकर यांनी आभार मानले.
रमेश वडजे, अब्दुल गफार मोईन शेख, नरेश लहाने, श्याम तापसकर, संजय खत्री, शशिकांत पेंडसे, आप्पासाहेब काटे, नंदू साळुंखे, स्वाती साळुंके, गजानन शेफाळ, सीमा चिंचोळकर, हर्षल चिंचोळकर, प्रशांत बगळ यांच्यासह अनेक मान्यवरांची आणि माजी विद्यार्थ्यांची यावेळी उपस्थिती होती.
चौकट :
सायंकाळच्या सत्रात शाकमतर्फे वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ललित कला अकादमीचे अध्यक्ष शिल्पकार उत्तम पाचारणे, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे उपाध्यक्ष अद्वैत गडनायक, डॉ. गणेश तरतरे, अनंत निकम, भारत उबाळे, किशोर निकम यांनी विविध विषयांवर संवाद साधला.
फोटो ओळ :
चित्रप्रदर्शन आणि माजी विद्यार्थी संपर्क कक्षाचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, आमदार अंबादास दानवे आणि इतर मान्यवर.