शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा ठणठणाट ; विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:37 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा बुधवारी अंत झाला. अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीला टाळे ठोकत, प्रशासनाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली. तेव्हा प्रशासन, कुलगुरूंच्या निषेध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

ठळक मुद्देविद्यापीठ : कुलगुरूंच्या भेटीला मज्जाव केल्यामुळे विद्यार्थी संतप्त; घोषणाबाजीने परिसर दणाणला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा बुधवारी अंत झाला. अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीला टाळे ठोकत, प्रशासनाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली. तेव्हा प्रशासन, कुलगुरूंच्या निषेध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.विद्यापीठातील वसतिगृहे, सामाजिकशास्त्रे इमारत, अभ्यासिकेसह इतर इमारतींमध्ये पिण्याच्या पाण्याची मागील सहा महिन्यांपासून समस्या आहे. पाण्यासाठी विद्यार्थ्यांना भटकंती करावी लागत आहे. या समस्येला वाचा फोडण्यासाठी विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ बुधवारी कुलगुरूंना भेटण्यासाठी गेले; मात्र कुलगुरू बैठकीत असल्यामुळे विद्यार्थ्यांना भेट नाकारली. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीच्या प्रवेद्वारावरच तीव्र आंदोलन सुरू केले. सुरक्षा विभागाच्या अधिकाºयांनी मुख्य प्रवेशद्वाराला टाळे लावले. त्यामुळे विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाºयांनी प्रवेशद्वारातच खुर्चीवर दगड ठेवून श्रद्धांजली सभा घेतली. या खुर्चीची प्रतीकात्मक प्रेतयात्राही काढली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यात डॉ. कुणाल खरात, अक्षय पाटील, अमोल दांडगे, लोकेश कांबळे, मयूर सोनवणे, दीपक बहिर, मनीषा मगरे, प्राजक्ता शेटे, सत्यजित मस्के, प्रशांत बोर्डे, गणेश शिंदे आदी विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.आश्वासनानंतर आंदोलन स्थगितप्रवेशद्वाराला टाळे ठोकल्यानंतरही प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी कोणीही आले नाही. बºयाच वेळेने विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे, मुख्य अभियंता रवींद्र काळे, अशोक देशमाने आदींनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. एका दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन या अधिकाºयांनी दिले. यावर विद्यार्थ्यांनी चार दिवसांत ही मागणी पूर्ण झाली नाही, तर कुलगुरूंच्या निवासस्थानावर घागर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.