शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
3
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
4
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
5
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
6
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
7
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
8
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
9
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
10
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
11
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
12
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
13
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
14
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
15
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
16
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
17
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
18
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
19
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
20
नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं

कोरडे पडलेले पाणवठे वन्यजीवांसाठी जलमय

By admin | Updated: March 14, 2016 00:31 IST

गजानन वाखरकर, औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग नागनाथ तीर्थक्षेत्रामुळे प्रसिद्ध असलेल्या औंढा येथील पश्चिम वनपरिक्षेत्राअंतर्गत बांधण्यात आलेल्या १८ पाणवठ्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या तलावाचे पाणी आटून गेले

गजानन वाखरकर, औंढा नागनाथज्योतिर्लिंग नागनाथ तीर्थक्षेत्रामुळे प्रसिद्ध असलेल्या औंढा येथील पश्चिम वनपरिक्षेत्राअंतर्गत बांधण्यात आलेल्या १८ पाणवठ्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या तलावाचे पाणी आटून गेले असल्याने वन्यप्राण्यांची भटकंती होत असल्यामुळे या विभागाच्या वतीने विकत घेवून पाणी पाणवठ्यात सोडण्यात येत आहे. हे काम सध्या सुरू असल्याने या उपक्रमाचे वन्यप्रेमींकडून स्वागत केले जात आहे.औंढा नागनाथ पश्चिम वन विभागाच्या वतीने वनपर्यटन परिसरामध्ये १२ पाणवठे पाण्याअभावी कोरडे पडले होते. त्यालगत असलेल्या तलावातील पाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सील करण्यात आल्याने या पाणवठ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असलेल्या बगीचासाठी सुद्धा विकत घेवून पाणी देण्याचे काम वनपरिमंडळ अधिकारी एस. आर. दोडके, वनरक्षक ए. व्ही. भोसले, विलास चव्हाण, गोपाळ टोम्पे हे करीत आहेत. या ठिकाणी गार्डनमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या झाडांना सुद्धा पाणी देवून वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर ब्राम्हणवाडा येथे २, अंजनवाडा येथे ३ व दुधाळा येथे २ असे पाणवठे जंगलातील प्राण्यांना पाणी पिण्यासाठी बांधण्यात आले होते. नैसर्र्गिक जलस्त्रोत व तलाव, खाजगी विहिरींमधून पाणी घेवून या पाणवठ्यामध्ये सोडल्या जात होते. गत दोन महिन्यांपासून हे सर्व जलस्त्रोत आटल्याने जंगलातील वन्यप्राणी पाण्यासाठी गावालगत असलेल्या शेतामध्ये भटकत होते. ही बाब वनविभागाच्या लक्षात आल्याने अधिकाऱ्यांनी तत्काळ याची दखल घेत बांधण्यात आलेल्या पाणवठ्यामध्ये टँकरने विकत पाणी घेवून सोडण्यास सुरूवात केली आहे. आठ दिवसांतून एकवेळा हे पाणी पाणवठ्यात सोडल्या जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी डी.एस. खुपसे यांनी दिली आहे. पूर्व विभागात भटकंती : प्राण्यांचे हालऔंढा नागनाथ तालुक्यातील पुर्व परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या जंगलामध्ये मोजक्याच ठिकाणी पाणवठे बांधण्यात आले आहेत. या ठिकाणी झालेले काम थातूरमातूर केल्याने हे पाणवठे जमीनदोस्त झाले आहेत. या परिसरात वन्यप्राण्यांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत.यंदाच्या दुष्काळाची दाहकता जंगलातील प्राण्यांनाही जाणवत आहे. जलालदाभा, सिरळी, सेंदूरसेना, सुकळी, मरसूळवाडी व शिरडशहापूर परिसरातील वन्यप्राणी पाण्यासाठी भटकंती करत नागरीवस्तींकडे धाव घेत आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांची शिकार होण्याची शक्यता वाढली आहे. औंढा नागनाथ पश्चिम वन विभागाच्या वतीने वन पर्यटन परिसरामध्ये तयार करण्यात आलेले १२ पाणवठे यंदा कोरडे पडले आहेत. परिणामी वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी शोधताना भटकंती करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी पाण्याची सोय केली आहे.