शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘जलवाहिनी’अडकली वादाच्या भोवऱ्यात...!

By admin | Updated: May 18, 2017 00:31 IST

जालना: शहरातील अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम आपल्याच प्रभागात व्हावे म्हणून नगरसेवकांत स्पर्धा सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना: शहरातील अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम आपल्याच प्रभागात व्हावे म्हणून नगरसेवकांत स्पर्धा सुरू आहे. परिणामी कुठल्याही एका भागात काम पूर्ण होत नसल्याचे दिसून आले आहे. शहरातील वॉर्ड अंतर्गत कामे मंजूर झाल्याने नगरसेवकांनी जलवाहिनी कामाची कामासाठी हट्ट धरल्याचे सांगण्यात येते. निजामकालीन अंतर्गत जलवाहिनी बदलून त्याजागी नवीन जलवाहिनी अंथरण्यात येत आहे. सुमारे साडेचारशे किमी जलवाहिनीचे काम होणार असून, त्यापैकी ५० ते ६० कि.मी.चे काम पूर्ण झाल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात येते. प्रत्यक्षात या कामासाठी अनेक नगरसेवकांत काम आपल्याच प्रभागात व्हावे म्हणून ओढताण होत आहे. यामुळे कंत्राटदार तसेच जलवाहिनी अंथरणाऱ्या कर्मचाऱ्यांत संभ्रम होत आहे. नगरोत्थान अंतर्गत शहरातील १५ विविध वॉर्ड अंतर्गत सिमेंट तसेच डांबरी रस्ते तयार करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसांत हे कामे सुरू होणार आहेत. मात्र जलवाहिनीचे काम अगोदर झाल्यास रस्ते कामाचा मार्ग मोकळा होईल म्हणून काही नगरसेवकांनी ही कामे या प्रभागात अधी करावी म्हणून जोर लावला आहे. १२७ कोटींची ही योजना राबविण्यात येत असून, नुकतेच या जलवाहिनी कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर नगरसेवक सक्रिय झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी गल्ली बोळातील रस्ते व डांबरीकरणाच्या कामाचे कंत्राट नगरसेवकांनी घेतले आहेत. जलवाहिनीचा अडसर असल्यामुळे ही कामे करण्यास नगरसवेकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे जलवाहिनी अंथरण्यासाठी नगरसेवकांचा पाठपुरावा सुरू आहे. आझाद मैदान, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, इंदेवाडी, चंदनझिरा, सदर बाजार, सकलेचा नगर, रामनगर, नागेवाडी, एसआरपीएफ, मार्केट यार्ड, किल्ला झोन, सिद्धीविनायक नगर, सामनगाव, अहमद उर्दू स्कूल, शब्बीर अली चौक, नूतन वसाहत, पाणीवेस हे शहरातंर्गत झोन आहेत. पैकी कलेक्टर आॅफीस झोनमधील काम अंतिम टप्प्यात आहेत. हे ५० किमी झाल्याचे पाणीपुरवठा अभियंत्यांनी सांगितले. अंतर्गत जलवाहिनीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, मंगळवारी उर्वरित पाईप जालना शहरात आले.