शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

‘मांजरा’तून कोणत्याही क्षणी होणार पाणी बंद..!

By admin | Updated: June 24, 2014 00:42 IST

आशपाक पठाण , लातूर गेल्या वर्षभरापासून पाणीटंचाईचे चटक्यावर चटके सहन करणाऱ्या लातूरकरांचे आता पाण्यासाठी अतोनात हाल होणार आहेत़

आशपाक पठाण , लातूरगेल्या वर्षभरापासून पाणीटंचाईचे चटक्यावर चटके सहन करणाऱ्या लातूरकरांचे आता पाण्यासाठी अतोनात हाल होणार आहेत़ मांजरा धरणातील पाण्याने तळ गाठल्याने ही अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पातील पंपाना पुरेसे पाणी मिळविण्यासाठी खोदलेले चरही कोरडेठाक पडत आहेत. नागझरीत गाळ धरुन ०. १ दलघमी पाणी आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसात वरूण राजा मनासारखा बरसला नाही तर साडेपाच लाख लोकसंख्येच्या शहराला जलसंकटातून बाहेर पडणे अवघड आहे. लातूरकर आणि पाणीटंचाई हे समीकरण गेल्या वर्षभरापासून अधिकच घट्ट जुळले आहे़ मागील वर्षीही भर पावसाळ्यातही शहरवासियांना आठवड्यातून एकदा पाणी मिळाले़ त्यानंतर लागलीच दहा दिवसांतून एकवेळा पाणीपुरवठा सुरू झाला तो अजूनही कायम आहे़ महानगरपालिका कार्यक्षेत्रात वाढती लोकसंख्या, पाण्याचा बेसुमार वापर यामुळेही टंचाईत भर पडली असली तरी गेल्या दोन वर्षांपासून पाऊस अपुरा पडत असल्याने अशी परिस्थिती ओढवलीय़ मांजरा धरणातून पंपांना पाणी मिळत नसल्याने जवळपास ८ महिन्यांपासून चर खोदून पाणी उपसा केला जात आहे़ मात्र, आता चर खोदूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने कोणत्याही क्षणी पाणीपुरवठा बंद होण्याची भिती व्यक्त केली जात आहे़ पंप बंद पडू नये, यासाठी प्रशासनाकडून नालीतील गाळ, दगड काढून पंपापर्यंत पाणी आणले जात असले तरी प्रकल्पात पाणीच अत्यल्प असल्याने बिनदिक्कतपणे गाळमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. पण आता त्यालाही मुकण्याची वेळ लातुरकरांवर आली आहे. गढूळ अन् गाळाचे मिश्रण़़़लातूर शहरातील काही भागात नळाला गढूळ व गाळमिश्रित पाणी येत आहे़ मांजरा प्रकल्पातील गाळातून येणाऱ्या पाण्याचे जलशुध्दीकरण यंत्रातही व्यवस्थित शुध्दीकरण होत नसल्याने गढूळ पाणीच पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे़ साठविलेल्या पाण्यासही वास येत आहे.शहराला रोज लागते ४० एमएलडी पाणी...लातूर शहरात सध्या दहा दिवसाला एकदा पाणीपुरवठा होतो. दररोज ४० एमएलडी पाण्याची गरज असतानाही निव्वळ ३४ एमएलडी पाणी सोडले जाते. यात मांजरातून १६ एमएलडी आणि नागझरीतून १८ एमएलडी पाणी येते. पण मांजरातून १६ एमएलडी पाणी येणे बंद झाल्यास त्याचा अतिरिक्त भार नागझरीवर पडणार आहे. सध्या नागझरीत एमजेपीच्या मते गाळधरुन ०.०१ दलघमी इतका पाणीसाठा आहे. त्यांच्या मते हे १५ दिवसातून एकदा पाणी दिल्यास हे पाणी जुलैै महिना पुरेल असे वाटते. परंतु यावर काहीजण सांशक आहेत. त्यामुळे लातूरकर फक्त पाऊसभरोसे आहेत. या दोन्ही धरणात पाणीसाठा वाढायला किमान १० दिवस चांगला पाऊस पडणे आवश्यक आहे. -तर पंप बंद पडेल: कार्यकारी अभियंता सोनकांबळेरेणापूर तालुक्यातील भंडारवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे़ मांजरा प्रकल्पातून पाणी उपसा करणाऱ्या पंपाला पाणी कमी पडत आहे़ चर खोदून गाळ, दगड काढण्यात येत आहे़त सर्व प्रयत्न केले तरी आता पाणी येणे कठीण झाले आहे़ आठवडाभरात पाऊस न झाल्यास काही वेळ बंद पडण्याची शक्यता आहे़ मांजरातील पाणी बंद पडल्यास नागझरी बॅरेजसमध्ये असलेल्या पाण्यावर शहराची तहान भागविणे भागणे मुश्कील आहे़ नागझरीतून १५ दिवसांतून एकवेळा पाणी पुरवठा करावा लागेल़ शहराची तहान भागविण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला तरी पाऊस हाच एकमेव पर्याय उपलब्ध असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सोनकांबळे यांनी सांगितले़