शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस होण्याच्या स्वप्नांवर फिरणार पाणी

By admin | Updated: March 1, 2016 00:29 IST

औरंगाबाद : पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून दिवसरात्र एक करून परिश्रम घेतले. त्यासाठी संपूर्ण तयारी केली. आता भरती अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे

औरंगाबाद : पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून दिवसरात्र एक करून परिश्रम घेतले. त्यासाठी संपूर्ण तयारी केली. आता भरती अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे. त्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक आहे; परंतु उमेदवारांना घाटी रुग्णालय आणि जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय प्रशासन इतरांकडे बोट दाखवून थेट माघारी पाठवीत आहेत. त्यामुळे पोलीस होण्याच्या स्वप्नांवर पाणी फिरण्याची परिस्थिती निर्माण होत असल्याने शेकडो उमेदवारांनी सोमवारी तीव्र संताप व्यक्त केला. पोलीस भरतीपूर्व वैद्यकीय तपासणीसाठी काही दिवसांपासून इच्छुक उमेदवार घाटी रुग्णालयात येत आहेत. छातीचा एक्सरे, रक्त चाचणी, शुगर, रक्तदाब इ. तपासण्या करून फिटनेस प्रमाणपत्र मिळविणे आवश्यक आहे. घाटीने अनेकांना प्रमाणपत्रांचे वितरण केले; परंतु उमेदवारांची गर्दी वाढत असल्याने आता घाटी रुग्णालय आपली जबाबदारी नसल्याचे म्हणत प्रमाणपत्र देण्याचे टाळत आहे. त्यामुळे तपासण्या केलेल्या शेकडो उमेदवारांना वारंवार घाटीत चकरा माराव्या लागत आहेत, अशा उमेदवारांनी सोमवारी सकाळपासून घाटीत गर्दी करीत संताप व्यक्त केला. त्यांना घाटीतर्फे जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय येथे जाण्यास सांगण्यात आले; परंतु तिकडूनही माघारी पाठविण्यात आले. घाटीत विविध तपासण्या केल्या. अनेकांना प्रमाणपत्र दिले; परंतु आता प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जात आहे, असे त्रस्त उमेदवारांनी सांगितले.