शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

आठवड्यापासून पाण्याची बोंबाबोंब

By admin | Updated: December 26, 2014 00:15 IST

औरंगाबाद : शहरात आठवड्यापासून पाण्याची बोंबाबोंब सुरू असून, ख्रिसमसचा सणही नागरिकांना पाण्याविना साजरा करण्याची वेळ आली.

औरंगाबाद : शहरात आठवड्यापासून पाण्याची बोंबाबोंब सुरू असून, ख्रिसमसचा सणही नागरिकांना पाण्याविना साजरा करण्याची वेळ आली. शुक्रवारी पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा कंपनीने केला आहे. गुरुवारी जायकवाडीतील दोन आणि फारोळ्यातील एक जलउपसा पंप बंद होता. फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील पंप सायंकाळी ६ वाजेनंतर सुरू झाला, तर जायकवाडीतील पंप उशिरा सुरू झाले. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जायकवाडीतील पंप बंद होते, तर फारोळ्यातील पंप तांत्रिक बिघाडामुळे बंद पडला होता. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला. गेल्या शुक्रवारपासून सिडको-हडकोमध्ये पाणीपुरवठा झालेला नाही. तर उर्वरित शहरात मंगळवारपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नाहीय. त्यातच नाताळचा सण असल्यामुळे छावणी, शांतीपुरा वॉर्डातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. खाजगी टँकर्सकडून नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागले. चार तास पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले होते. महापौरांनी केली पाहणीमहापौर कला ओझा यांनी समर्थनगर भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीवरून पाहणी केली. यावेळी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटीचे अभियंते, कर्मचाऱ्यांसह मनपा अभियंता हेमंत कोल्हे आदींची उपस्थिती होती. त्यानंतर आ.अतुल सावे, नगरसेवक प्रशांत देसरडा यांनीही एन-५ येथील जलकुंभ पाणीपातळीचा आढावा घेतला. सिडको-हडको पाण्याची बोंब होत असल्याकारणाने भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जलकुंभावरील कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. पवननगरमध्ये आज एक टप्पा देण्यात आला. दुसरा टप्पा रात्री उशिरा देण्यात येणार होता. मात्र, पाणीपुरवठाच झाला नाही,असे नितीन चित्ते यांनी सांगितले.वीजपुरवठा खंडित...जायकवाडी पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे दोन पंप बंद पडले. तर फारोळ्याचा पंप बंदच होता, तो सायंकाळी उशिरा सुरू झाला. त्यामुळे अनेक भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. एकापाठोपाठ एक पंप बंद पडण्याची मालिका सुरू असल्यामुळे जलवाहिन्यांतून पाणी येण्यास उशीर होत गेला. परिणामी शहरात अनेक भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. दूषित पाण्याच्या ७०० तक्रारीदूषित पाणीपुरवठ्याच्या ७०० तक्रारी कंपनीकडे करण्यात आल्या आहेत. १ सप्टेंबरपासून आजपर्यंतच्या तक्रारी असून, त्यातील ६३९ तक्रारींचा निपटारा केल्याचा दावा कंपनीने केला आहे. आज रेल्वेस्टेशन व इतर भागातील जलवाहिन्यांची दुरुस्ती केली. तसेच समर्थनगर, सिद्धार्थनगर भागातील दूषित पाणीपुरवठ्यावर उपाय म्हणून जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे कंपनीने कळविले आहे. सुरेवाडीत ठणठणाटसुरेवाडी परिसरात पाणीपुरवठा न झाल्यामुळे आज नागरिकांनी एन-५ येथील जलकुंभावर गर्दी केली होती. कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठा केव्हा होणार याची माहिती विचारली; मात्र कुणीही त्यांना उत्तर दिले नाही. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गळतीऔरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीतील अनेक अधिकारी, कर्मचारी काम सोडून जात असल्याचे वृत्त आहे. ग्राहक सेवा अधिकाऱ्यांनी मागील महिन्यातच काम सोडले आहे. कंपनीत नवीन अधिकारी नेमले जात आहेत. परंतु त्याचा परिणाम पाणीपुरवठा यंत्रणेवर होतो आहे. जुने कर्मचारी सोडून जात असल्यामुळे नवीन कर्मचाऱ्यांना यंत्रणेची माहिती घेताना दमछाक होते आहे. सध्या कंपनीकडे मनपाचे ३९३ कर्मचारी आहेत. २०० कर्मचारी कंत्राटी म्हणून घेतले आहेत. ३८ कंपनीचे अधिकारी आहेत. अधिकाऱ्यांपैकी काही जणांनी राजीनामे दिले आहेत. परंतु त्यांचे राजीनामे अद्याप मंजूर झालेले नाहीत. परंतु ते अधिकारी कामावर येत नाहीत. कंपनीने आॅपरेशन, मेन्टेनन्स, सर्व्हिस, एचआर, सिव्हिल, सप्लाय, अशा वेगवेगळ्या आस्थापनेखाली अधिकारी, कर्मचारी नेमले आहेत. व्यवसाय प्रमुख गौरीशंकर बासू यांनीही राजीनामा दिल्याची चर्चा होती; मात्र त्यांचा राजीनामा कंपनीने घेतला नाही. १ सप्टेंबरपासून कंपनीने पाणीपुरवठा देखभाल, दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. चार महिन्यांतच कंपनीला वैतागून कर्मचारी पळ काढीत असल्यामुळे आगामी काळात नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होणार की नाही, असा प्रश्न आहे. कंपनीच्या मते कॉर्पाेरेट संस्थेमध्ये कर्मचारी येतात, जातात. त्याचा संस्थेच्या सेवा क्षेत्रावर कुठलाही परिणाम होत नाही. काही जणांनी राजीनामे दिले आहेत. मात्र, अजून कुणीही काम सोडून गेलेले नाही.