शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा अपव्यय; शेतीचेही नुकसान

By admin | Updated: May 16, 2017 00:06 IST

अणदूर : एकीकडे भीषण उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असतानाच दुसरीकडे मात्र कालवा फुटून व झिरपून लाखो लिटर पाणी शेतशिवारात घुसले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअणदूर : एकीकडे भीषण उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असतानाच दुसरीकडे मात्र कालवा फुटून व झिरपून लाखो लिटर पाणी शेतशिवारात घुसले आहे. यामुळे येथील नागझरी परिसरातील अनेकांची शेतजमीन पाण्याखाली जावून चवाळे लागल्याने ही जमीन नापीक बनली आहे. असे असताना प्रशासनाने मात्र अद्याप याकडे पाहिले नसल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे. नळदुर्ग येथील कुरनूर प्रकल्पातून (बोरी धरण) उन्हाळी पिकांसाठी कालव्यामध्ये पाणी सोडण्यात येथे. परंतु, सन २०१४, २०१५ व २०१६ या वर्षांमध्ये दुष्काळ असल्यामुळे हे पाणी सोडण्यात आले नाही. गतवर्षी मुबलक पाऊस झाल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे यंदा उन्हाळी पिकांसाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. याचा लाभ अणदूर, नळदुर्ग, वागदरी, येडोळा, खुदावाडी, शहापूर, गुजनूर, सराटी, धनगरवाडी, बाभळगाव आदी गावच्या शिवारातील शेतीला होतो. परंतु, हे पाणी सोडण्यापूर्वी कालव्याची दुरूस्ती व्यवस्थित झाली नसल्यामुळे नागणखोरीनजिक कालवा फुटून लाखो लिटर पाणी अक्षरश: शेतात घुसले आहे. त्यामुळे अनेकांच्या जमिनीला चवाळ लागले आहे. अशा परिस्थितीत या भागातील शेतकरी खरीप पेरणीपूर्वीची मशागतही करू शकत नाही. ऊस पिकातील अंतर्गत मशागतीचे कामही चवाळ लागल्यामुळे बंदच आहे. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटकास बसत असून, प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.