शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाकीचा जिना कोसळला

By admin | Updated: July 2, 2017 00:43 IST

औरंगाबाद : सिडको एन-७ येथे १९७५ मध्ये बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचा जीर्ण भाग शनिवारी सकाळी ६ वा. अचानक कोसळला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिडको एन-७ येथे १९७५ मध्ये बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचा जीर्ण भाग शनिवारी सकाळी ६ वा. अचानक कोसळला. पाण्याच्या टाकीवर जाणाऱ्या पायऱ्यांचा मलबा कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानावर लोखंडी पत्रे चिरून घरात कोसळला. विशेष बाब म्हणजे ज्या खोलीवर हा मलबा पडला तेथे मनपा कर्मचाऱ्यांची दोन लहान मुले झोपली होती. सुदैवाने दोन्ही चिमुकले बालंबाल बचावली. घटनास्थळी तातडीने मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी भेट दिली.सिडको एन-७ आंबेडकरनगर येथे नगर परिषदेच्या काळात १९७५ मध्ये पाण्याची टाकी बांधण्यात आली. या टाकीवरून तब्बल १३ वॉर्डांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे टँकरद्वारे पाणी भरण्यात येते. मागील दोन वर्षांपासून सिडको-हडकोतील नगरसेवक प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करीत आहे की, पाण्याची टाकी जीर्ण झाली असून, ती कोणत्याही क्षणी कोसळू शकते. मात्र, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. शनिवारी सकाळी ६ वा. अचानक टाकीच्या पायऱ्यांचा काही भाग निखळला.सिमेंटचा मलबा थेट मनपा कर्मचारी संजय जेजूरकर, मोहन चांदोरे यांच्या निवासस्थानावर कोसळला. यावेळी जेजूरकर यांच्या घरातील लहान मुले रितिका, सार्थक जेजूरकर साखरझोपेत होती. मलबा एवढा जोरात कोसळला की, घरावरील लोखंडी पत्रे कापली गेली. घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकीची मोडतोड झाली. सुदैवाने कोणालाही इजा पोहोचली नाही.घटनेची माहिती सकाळी १०.३० वा. कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर लगेचच मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकरही दाखल झाले. त्यांनी निवासस्थानात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना तातडीने दुसऱ्या निवासस्थानांमध्ये स्थलांतरित केले.पाण्याची टाकी जमीनदोस्त करण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी, त्यापूर्वी नवीन टाकी उभारण्याच्या दृष्टीने तातडीने अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिले. आपण टाकी धोकादायक असल्याचे पत्र वारंवार दिल्याचे नगरसेवक नितीन चित्ते, राहुल रोजतकर यांनी सांगितले.