नांदेड: जेएनएनयुआरएम योजनेतंर्गत तरोडा भागातील पाणी पुरठ्याची कामे सुरू असून सरपंचनगर ते गजानन मंदिर या परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येत आहे़ तरोडा भागात १२ कोटींची पाणीपुरवठा योजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे़ ९७ लाख रूपये खर्च करून अरिहंतनगर येथे जलकुंभ उभारण्यात आले आहे़ १३ लक्ष लिटर क्षमता असलेल्या या जलकुंभामुळे जुन्या तरोडा गावालाही लाभ मिळणार आहे़ तरोडा खु़ भागातील सरपंचनगर, दिपनगर, बोधीसत्वनगर, तथागतनगर, सिद्धांतनगर, छत्रपती नगर, जैनमंदिर, तुळशीरामनगर, पालीनगर, गजानन मंदिर, आयोध्यानगर, भवितव्यनगर, शिवदत्तनगर, लाभनगर, रतननगर, ओंकारेश्वरनगर, अरिहंतनगर, उपसरपंचनगर, शिवरायनगर, व्यंकटेशनगर, बेलानगर, अनिकेतनगर या नगरांसोबतच तरोडा खु़ गावात या जलकुंभातंर्गत पाईप लाईन करण्यात येत आहे़ सिद्धांतनगर येथे पाणी पुरवठ्याची कामे हाती घेण्यात आले आहेत़ येथील उत्तर भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायम होता़ अखेर या भागात पाईपलाईनचे काम शनिवारी सुरू करण्यात आले़ यासंदर्भात नगरसेवक बालाजी कल्याणकर म्हणाले, सिद्धांतनगरातील रस्ते व पाणीपुरवठ्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता़ पाणीपुरवठा योजनेचा लाभ या नगराला होणार आहे़ लवकरच रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असून नालीचा प्रश्न सोडविण्यासाठी या नगरातील मोकळे भूखंड घेण्यात येतील़ (प्रतिनिधी)
पाणीपुरवठ्याची कामे सुरू
By admin | Updated: June 22, 2014 00:42 IST