शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेवर जलसंकट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:11 IST

दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा महिनाभरावर येवून ठेपलेली असताना जिल्हा परिषद प्रशासनाकडून अद्याप कुठलीही तयारी करण्यात आली नाही़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी घोषणा केलेला साडेपाच कोटींचा निधीही दृष्टिपथात नाही़ त्यात दुष्काळाच्या काळात अख्ख्या लोहा तालुक्याची तहान भागविणाºया पाणीपुरवठा योजनेची वीज ६० लाखांच्या थकबाकीपोटी तोडण्याची तयारी महावितरणने केली आहे़ त्यामुळे माळेगाव यात्रेवर जलसंकटाचे सावट आहे़

शिवराज बिचेवार।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा महिनाभरावर येवून ठेपलेली असताना जिल्हा परिषद प्रशासनाकडून अद्याप कुठलीही तयारी करण्यात आली नाही़ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी घोषणा केलेला साडेपाच कोटींचा निधीही दृष्टिपथात नाही़ त्यात दुष्काळाच्या काळात अख्ख्या लोहा तालुक्याची तहान भागविणाºया पाणीपुरवठा योजनेची वीज ६० लाखांच्या थकबाकीपोटी तोडण्याची तयारी महावितरणने केली आहे़ त्यामुळे माळेगाव यात्रेवर जलसंकटाचे सावट आहे़यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात दक्षिण भारतातून भाविक श्रीक्षेत्र माळेगाव येथे खंडोबाच्या दर्शनासाठी येतात़ लाखोंच्या संख्येने हौसे-नवशे-गवशेही यात्रेत सहभागी होतात़ येत्या १६ डिसेंबरला पालखीपासून यात्रेला सुरुवात होते, परंतु जिल्हा परिषदेत एकमेकांच्या तंगड्या ओढण्यात मश्गुल असलेल्या पदाधिकाºयांनी माळेगाव यात्रेच्या नियोजनासाठी अद्याप एकही बैठक घेतली नाही़ जवळपास पंधरा लाखांवर भाविक या यात्रेत येत असल्यामुळे त्यांच्यासाठी शुद्ध पाणी, रस्ते, दिवाबत्ती, निवारा आणि सुरक्षा ही कामे जिल्हा परिषद कधी करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ या सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायत सक्षम नाही़ त्यामुळे ग्रामपंचायतीची सर्व मदार ही जिल्हा परिषदेवरच आहे़ तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माळेगावात धनगर मेळाव्यानिमित्त आले होते़ त्यावेळी त्यांनी ५ कोटी ५५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची घोषणा केली होती, परंतु छदामही अद्याप मिळाला नाही़ यात्रा तोंडावर असताना, मुख्यमंत्री कार्यालयातून ग्रामपंचायतीशी संपर्क साधण्यात आला़ बांधकाम विभागाकडून निधीबाबत सचिवालयात फाईल पाठविल्याचे सांगण्यात आले़ परंतु वरातीमागून घोडे असा हा प्रकार असून यात्रेपूर्वी हा निधी मिळण्याची शक्यता कमीच आहे़ तर दुसरीकडे दुष्काळाच्या काळात अख्ख्या लोहा तालुक्याची तहान भागविणाºया पाणीपुरवठा योजनेवर गंडांतर आले आहे़ दिवंगत विलासराव देशमुख यांचे वडील दगडोजीराव देशमुख यांनी २० वर्षांपूर्वी लिंबोटीतून माळेगावला जलवाहिनीद्वारे पाणी आणण्यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता़ त्यातून माळेगावला पाणीपुरवठाही करण्यात येत होता़ परंतु मागील वर्षी लोहा तालुक्यात दुष्काळ पडला होता़ तत्कालीन जिल्हाधिकारी सुरेश काकाणी, एसडीओ अश्विनी पाटील यांनी बैठक घेतली होती़ त्यात योजनेद्वारे लोहा तालुक्याची तहान भागविण्यात आली़ परंतु प्रशासनाकडून त्या काळात पाणीपुरवठा केल्याचे वीजबिल देण्यात आले नाही़ त्यामुळे ६० लाखांच्या थकबाकीपोटी आता महावितरण या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा तोडण्याची तयारी करीत आहे़ त्यामुळे ऐन यात्रेच्या काळात प्रशासनाला पाणीपुरवठ्यासाठी धावपळ करावी लागणार आहे़