शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

डिसेंबरपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा

By admin | Updated: September 13, 2014 00:10 IST

नांदेड : विष्णूपुरी प्र्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे नांदेडकरांना १५ सप्टेंबरपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला़

नांदेड : विष्णूपुरी प्र्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे नांदेडकरांना १५ सप्टेंबरपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला़ शहराला डिसेंबर २०१४ पर्यंत एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे़ महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती उमेश पवळे यांनी मागील आठवड्यात झालेल्या स्थायी सभेत एक दिवसआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला़ त्यानंतर आयुक्तांनी १५ सप्टेंबरपासून शहराला एक दिवसाआड पाणी सोडण्याचे जाहीर केले आहे़ सणासुदीच्या काळात नागरिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी डिसेंबर २०१४ पर्यंत एक दिवसआड पाणी सोडण्यात येणार आहे़ सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे़ पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे - विषम दिनांक १५ , १७, १९, २१ सप्टेंबर या प्रमाणे रेल्वे लाईनच्या दक्षिणेकडील भाग, वजिराबाद, गुरूद्वारा परिसर, इतवारा, गाडीपुरा, खुदबईनगर, होळी, चौफाळा, रंगारगल्ली, सिद्धनाथपुरी, गणिमपुरा, सिद्धार्थनगर, खडकपुरा, दुल्लेशाह रहेमाननगर, गोलचाळ, गंगाचाळ, पक्कीचाळ, सोमोश कॉलनी, मीलरोड, गोवर्धनघाट, देगावचाळ, चिखलवाडी, डॉक्टरलेन, गवळीपुरा, शिंधी कॉलनी, बाफनारोड, अबचलनगर, दशमेशनगर, महेबुबीयाकॉलनी, पाकिजानगर, एकबालनगर, मिल्लतनगर, गाडेगावरोड, छत्रपतीनगर जलकुंभावरील भाग, तरोडा खु़ भाग, शोभानगर, पौर्णिमानगर, हनुमानगड, व्हीआयपीरोड, गोकुळनगर, दत्तनगर,नवामोंढा व सिडको भाग़ सम दिनांक१६, १८, २०, २२ सप्टेंबर या प्रमाणे रेल्वे लाईनच्या उत्तरेकडील भाग, गणेशनगर, रामानंदनगर, विजयनगर, यशवंतनगर, राजनगर, कैलासनगर, निजामकॉलनी, अशोकनगर, आनंदनगर, श्यामनगर, हर्षनगर, शाहूनगर - बाबानगर, वसंतनगर, मगणपुरा, शिवाजीनगर, नईआबादी, विसावानगर, रविराजनगर, कल्याणनगर, सन्मित्रकॉलनी, प्रभातनगर, स्नेहनगर आदी़ (प्रतिनिधी)विष्णूपुरी प्रकल्प शंभर टक्के भरले असले तरी पुढील पावसाळ्यापर्यंत या प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे़ यंदा अडीच महिने पावसाने हुलकावणी दिल्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ८ दलघमी पाणी शिल्लक राहिले होते़ त्यामुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती़ मात्र उशिरा झालेल्या पावसाने प्रकल्प पूर्णपणे भरले़ त्यामुळे हे पाणी टिकविण्यासाठी योग्य काळजी घेण्याची गरज आहे़ शहराला नियोजन करून पाणी सोडणे, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करणे, पाण्याचा अपव्यय थांबविणे, फुटलेले पाईपलाईन तात्काळ दुरूस्ती करणे, आदी कामांसाठी समिती स्थापन करावी, अशी मागणी येथील नागरिक नंदकुमार चालिकवार यांनी केली आहे़