माजलगाव : सध्या रमजानचा महिना चालू असून नगर पालिकेच्या चुकांमुळे माजलगावकरांना पिण्याचे पाणी महिन्यातून केवळ दोन वेळाच मिळत आहे. यामुळे येथील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते तर दुसरेकडे मात्र पाणीपुरवठ्याच्या व्हाल्व्ह वरून खाजगी टँकरला पाणी पुरविले जाते. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत अल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. माजलगाव शहराची लोकसंख्या वाढल्याने नगरपालिकेने शहरातील पाईपलाईनसाठी करोडो रुपये खर्च करून शहरातील नागरिकांना दररोज पाणी मिळेल अशी व्यवस्था केल्याचे सांगितले होते. मात्र नगरपालिकेच्या नियोजनाअभावी शहरवासीयांना पाणी मिळत नाही. धरण उशाला व कोरड घशाला अशी स्थिती माजलगावकरांची झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणावरूनच ११ पुनर्वसित गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र याच योजनेच्या जलवाहिनीवर बसविण्यात आलेल्या व्हॉल्व वरून खाजगी टँकर चालक पाणी भरतात. एवढेच नाही तर लिकेज असलेल्या व्हॉल्ववरून शेकडो लिटर पिण्याचे पाणी वाया जाते. याबाबत अनेक वेळा नगर परिषदेकडे तक्रार केलेली असताना देखील याकडे दुर्लक्ष करत आहेत. याचाच परिणाम शहराला वेळेवर पाणी मिळत नाही. सध्या रमजानचा महिना असल्याने सणासुदीचे दिवस आहेत. अशा काळात तरी नागरिकांना वेळेवर पाणी द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. धरणात पाणी असताना देखील येथील नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. याबाबत प्रभारी मुख्याधिकारी अब्दुल सत्तार यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, माजलगाव शहर व ११ खेडी पाणीपुरवठ्यामुळे शहराला मिळणारे पाणी कमी प्रमाणात येते. शहर व ११ खेडी याची पाईपलाईन वेगळी करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. ती पाईपलाईन एक-दोन महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर तीन ते चार दिवसाला शहराला पाणी पुरवठा करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)खाजगी टँकरला विकले जाते पाणीमहिन्यातून दोन वेळाच मिळते माजलगाव शहराला पाणी.येथील नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने हंडाभर पाण्यासाठी करावी लागते शहरभर पायपीट.खाजगी टँकरला दिले जाते व्हॉल्ववरून पाणी.
रमजान महिन्यातही पाणीपुरवठा ठप्प !
By admin | Updated: July 26, 2014 00:38 IST