शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगाच्या वाहिनीतून औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:06 IST

समांतर जलवाहिनीचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिका आणि राज्य शासनाला या प्रकरणात कोणताही अंतिम निर्णय घेता येत नाही. यंदा उन्हाळ्यात पाण्यासाठी शहरात मोठी बोंबाबोंब होणार आहे. त्यापूर्वी डीएमआयसीने पैठणपासून शेंद्रापर्यंत टाकलेली जलवाहिनी शहरासाठी वापरता येऊ शकते का याची चाचपणी करण्यात येईल. यासंदर्भात लवकरच उद्योग विभागाचे सचिव सुनील पोरवाल यांच्यासोबत चर्चा करण्याचा मनोदय मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देनवीन पर्याय : आयुक्त करणार उद्योग सचिवांसोबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समांतर जलवाहिनीचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिका आणि राज्य शासनाला या प्रकरणात कोणताही अंतिम निर्णय घेता येत नाही. यंदा उन्हाळ्यात पाण्यासाठी शहरात मोठी बोंबाबोंब होणार आहे. त्यापूर्वी डीएमआयसीने पैठणपासून शेंद्रापर्यंत टाकलेली जलवाहिनी शहरासाठी वापरता येऊ शकते का याची चाचपणी करण्यात येईल. यासंदर्भात लवकरच उद्योग विभागाचे सचिव सुनील पोरवाल यांच्यासोबत चर्चा करण्याचा मनोदय मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी व्यक्त केला.शहराची लोकसंख्या १५ ते १६ लाखांपर्यंत गेली आहे. महापालिकेकडे ११० ते १२० एमएलडी पाणी उपलब्ध आहे. दररोज शहराची मागणी २०० एमएलडी पाण्याची आहे. मागील काही वर्षांपासून महापालिका विविध वसाहतींमध्ये तीन दिवसाआड, पाच दिवसाआड पाणी देत आहे. उन्हाळा सुरू होताच पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होणार आहे. त्याची चाहूल महापालिकेला आतापासूनच लागली आहे. समांतर जलवाहिनीचा निर्णय लागेपर्यंत डीएमआयसीने पैठण ते शेंद्रा अशी नवीन जलवाहिनी टाकली आहे. नक्षत्रवाडी किंवा फारोळा येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारून हे पाणी शहरासाठी वापरता येऊ शकते का? याची चाचपणी करण्याचा मनोदय आयुक्तांनी व्यक्त केला. डीएमआयसीने पैठण, कचनेर मार्गे शेंद्रापर्यंत ५५ कि.मी.ची जलवाहिनी उभारली आहे. जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. सध्या शेंद्रा एमआयडीसीला दररोज ९० ते ९५ एमएलडी या जलवाहिनीतून पाणी मिळणार आहे. सध्या एमआयडीसीला या पाण्याची गरज नाही. जेव्हा या भागात शंभर टक्के उद्योग सुरू होतील तेव्हाच पाण्याची गरज भासणार आहे. तेव्हापर्यंत हे पाणी शहरासाठी वापरता येऊ शकते का? याचा अंदाज घेण्यात येईल, असेही मुगळीकर यांनी नमूद केले.उद्योगमंत्र्यांची मदत घेणारशहरातील पाणीप्रश्न सुटावा यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना भेटून डीएमआयसीचे पाणी शहराला वापरता येऊ शकते का याचा विचार करण्यात येईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. शहरातील ४० टक्के वसाहतींना आजही महापालिका पाणी देऊ शकत नाही, ही दुर्दैवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.