शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

वैजापूर तालुक्यात उन्हाच्या चटक्याअगोदरच पाणीटंचाईच्या झळा असह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:54 IST

उन्हाचे चटके जाणवायला लागण्याअगोदरच वैजापूर तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जानेवारी महिन्यापासूनच तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरु असून आता उन्हाच्या झळा वाढल्याने ग्रामीण भागाची तहानही वाढली आहे.

मोबीन खानवैजापूर : उन्हाचे चटके जाणवायला लागण्याअगोदरच वैजापूर तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जानेवारी महिन्यापासूनच तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरु असून आता उन्हाच्या झळा वाढल्याने ग्रामीण भागाची तहानही वाढली आहे.तालुक्यातील पंधरा गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे प्रस्ताव पंचायत समिती प्रशासनाकडे दाखल केले आहेत. यातील चार गावांचे प्रस्ताव जिल्हाधिकारीस्तरावर मंजुरीसाठी आहेत.सध्या आठ गावांना नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून पाणीपुरवठा करण्यासाठी बारा विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात तालुक्यातील लासूरगाव येथे पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करण्यात आले होते. त्यांनतर टँकरच्या मागणीत वाढ होत गेली. नांदूर -मधमेश्वर भागात कॅनलच्या पाण्यामुळे पाण्याची परिस्थिती गंभीर नसली तरी तालुक्याचा उर्वरित डोंगरथडी व शिवना थडी हा भाग कोरडा आहे. या भागातील मन्याडचा अपवाद वगळता सर्व धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने तेथील नागरिकांना उपलब्ध पाण्याच्या स्त्रोतावरच तहान भागवावी लागत आहे. मन्याड धरणात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा आहे. पण या धरणातून पाणी उचलण्याची कोणतीही तांत्रिक प्रक्रिया शासनस्तरावर न करण्यात आल्याने या भागातील गावांची अवस्था दरवर्षी टंचाईग्रस्त होते व शासनाला टँकरवर लाखो रुपये खर्च करावे लागतात. विशेष म्हणजे याबाबत लोकप्रतिनिधीदेखील उदासिन असल्याचे चित्र आहे.टँकर सुरु असलेली गावेसद्यस्थितीत लासूरगाव, हडसपिंपळगाव, राहेगाव, सोनवाडी, उंदीरवाडी, पेंडेफळ, बाभूळगाव बु. व बळ्हेगाव या गावांना नऊ टँकरने पाणी पुरवले जात आहे. बाभुळगाव बु., जळगाव, शहाजतपूर, अमानतपूरवाडी यांचे टँकरचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आले आहेत. नालेगाव, धोंदलगाव, मालेगाव कन्नड, शिवराई, खिर्डी, हरगोविंदपूर व नारळा या गावांनी टँकरसाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता के.पी.कड यांनी दिली. दरम्यान, येत्या काही दिवसांत उन्हाच्या तीव्रतेमुळे टँकरच्या मागणीत वाढ होऊ शकते. गेल्या वर्षी उन्हाळ्यात साठ टँकरद्वारे तालुक्यात पाणीपुरवठा करण्यात आला होता. बाबतरा येथे दूषित पाण्याचा स्त्रोत असल्याने त्या ठिकाणी जवळपास बारा महिने टँकरने पाणीपुरवठा होत होता. पण येथील टँकर प्रशासनाने आता बंद केले आहेत. ग्रामपंचायतीतर्फे पाणी शुद्वीकरणाचा प्लँट बसविण्यात येणार आहे. त्याचा खर्च जवळपास २५ लाख रुपये इतका आहे.