शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

शाळांत पाणीटंचाई; विद्यार्थ्यांची गैरसोय

By admin | Updated: February 23, 2016 23:57 IST

हिंगोली : मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत आहे. परिणामी, पाणीपातळी खालावली असून अनेक शाळांतील हातपंप व बोअर कोरडे पडले आहेत.

हिंगोली : मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत आहे. परिणामी, पाणीपातळी खालावली असून अनेक शाळांतील हातपंप व बोअर कोरडे पडले आहेत. त्यामुळे शाळेत पाणीटंचाई निर्माण झाली असून विद्यार्थ्यांचे पाण्यावाचून गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे मागील काही वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान होत आले आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळाच्या संकटात सापडला असून पाणीपातळी खालावली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यामध्ये जि. प. च्या एकूण ८८० शाळांत १ लाख १३ हजार ७४४ तर इतर शाळांतून १ लाख ३६ हजार ७११ विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येतात. परंतु अनेक शाळांतील हातपंप व बोअर कोरडे पडले आहेत. त्यात पाणीपातळी खालावल्याने दिवसेंदिवस पाणीप्रश्न गंभीर होत चालला आहे. डिसेंबर महिन्यातच बोअर-हातपंप कोरडे पडल्याने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर उपाययोजना करून विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी पुरेल या पद्धतीचे नियोजन करणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही, परंतु अनेक शाळामध्ये पाण्याची सुविधा नाही, त्यात हातपंप व बोअरही कोरडे पडल्याने विद्यार्थी घरूनच पाणी पिण्यास आणत आहेत, किंवा जवळपास पाण्याचा शोध घेऊन तहान भागवत असल्याचे सध्या चित्र आहे.याबाबत सर्व शिक्षा अभियानच्या लेखा विभागाकडे विचारणा केली असता, त्यांनी सर्वच शाळेवर पाण्याची व्यवस्था असल्याचे सांगितले. तसेच हातपंप, विहिरी व नळाची सुविधा आहे. परंतु त्यांना पाणी आहे की, नाही याची माहिती आमच्या विभागाकडे नसते असे सांगून टोलवाटोलवीची उत्तरे दिली. त्यामुळे शाळेतील पाणीप्रश्न संबंधित अधिकारी व कर्मचारी किती गांभीर्याने घेत आहेत, हे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)शिक्षणाधिकारी गंगाधर जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, यावर्षी अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने निश्चितच पाणीटंचाई शाळेत उद्भवली असेल. त्यामुळे येत्या काही दिवसांतच बैठक बोलावून यावर उपाययोजना करण्यात येईल. तसेच संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन शाळेतील पाणीप्रश्न सोडवू, असे त्यांनी यावेळी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.