जालना : शहरासह जिल्ह्यातील पाणीटंचाईसह इतर विकास कामांच्या आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासन व पालिकेकडून संपूर्ण पाणीटंचाईचा लेखाजोगा तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यासाठी करण्यात आलेल्या आढाव्यात पाणीटंचाई नसल्याचे चित्र आहे.शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा मुद्दाही उपस्थित झाला आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाला असला तरी अवैध पाणी उपसा कडक उन्हामुळे जलसाठ्यांत झपाट्याने घट होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आठही तालुक्यात पाणीटंचाईचे वास्तव चित्र काय आहे, प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत, पाऊस न पडल्यास काय नियोजन आहे याचा तपशीलवार आढावा मुख्यमंत्री घेणार असल्याचे सांगण्यात येते. जालना शहराला जायकवाडी पाणीपुरवठा योजना व घाणेवाडी जलाशयातून पाणीपुरवठा होतो. सद्य स्थिती घाणेवाडीत बारा फुट पाणी असून, साधारणपणे जूनपर्यंत हे पाणी पुरेल अंदाज पालिका पाणीपुरवठा विभागाचा आहे. ग्रामीण भागात लघू व मध्यम प्रकल्प तसेच विहिरी व कूपनलिकांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. (प्रतिनिधी)
पाणीटंचाईचा आढावा!
By admin | Updated: April 18, 2017 23:54 IST