हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील उर्ध्व पैनगांगा विभागाला जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी इसापूर धरणाचे पाणी हिंगोली व नांदेड जिल्ह्याला सोडण्याच्या सूचना ११ मार्च रोजी दिल्या आहेत. त्यानुसार दोन दिवसांत इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सुटणार आहे. मार्च महिना अर्ध्यावर संपत आला असला तरी, अद्याप उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडले नाही. त्यामुळे या कालव्याच्या बाजूला असलेल्या बाळापूर, वारंगा, वाकोडी, डोंगरकडा व भाटेगाव, वडगाव, जवळा पांचाळ, डिग्रस बु. व खु, दांडेगाव, रेडगाव, सुकळीवीर आदी गावात पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आ. तानाजी मुटकूळे व निवृत्त कार्यकारी अभियंता पी. आर. देशमुख यांनी जलसंपदा मंत्र्यांची विधिमंडळात भेट घेवून पाण्याची समस्या मांडली. दरम्यान जलसंपदामंत्री महाजन यांनी तत्काळ उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाला पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सुटणार आहे. (प्रतिनिधी)
इसापूर धरणाच्या उजव्या कालव्यातून सुटणार पाणी
By admin | Updated: March 14, 2016 00:29 IST