शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीमिश्रित इंधनामुळे गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:45 IST

उस्मानपु-यातील युनिक आॅॅटो पेट्रोलपंपावर इंधन भरताना पाणीमिश्रित इंधन मिसळल्याची तक्रार काही तरुणांनी केल्याने बराच वेळ या पंपावर गोंधळ उडाला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : उस्मानपु-यातील युनिक आॅॅटो पेट्रोलपंपावर इंधन भरताना पाणीमिश्रित इंधन मिसळल्याची तक्रार काही तरुणांनी केल्याने बराच वेळ या पंपावर गोंधळ उडाला. अनेक संतप्त वाहनचालकांनी गुरुवारी दुपारी पंप व्यवस्थापनाला याबाबत जाब विचारल्याने गोंधळ घातला. भेसळीचा मात्र पंपचालकांनी इन्कार केला असून नमुने तपासणीनंतर सर्व स्पष्ट होईल, असे जिल्हा पुरवठा अधिका-यांनी स्पष्ट केले आहे.उस्मानपुरा येथील गोपाल टीजवळ मे. युनिक आॅटो नावाचा पंप आहे. या पंपावर बन्सीलालनगर येथील रोहित धूत यांनी त्यांच्या दुचाकीमध्ये शंभर रुपयांचे पेट्रोल भरले. यानंतर ते पंपावरून एक ते दोन किलोमीटरपर्यंत गेल्यानंतर गाडी अचानक बंद पडली. गाडी सुरू झाली की सारखी बंद पडायची, त्यामुळे त्यांनी इंधन टाकीत एअर अडकला असेल असे समजून एका पाण्याच्या प्लास्टिक बाटलीत टाकीतील पेट्रोल काढले असता एक लिटरच्या बाटलीत सुमारे शंभर मिलीलिटर पाणी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, असे त्यांनी सांगितले. देवगिरी कॉलेजमध्ये शिकत असलेला आकाश पवार (रा.बीड) यानेही सकाळी त्याच्या दुचाकीत इंधन टाकले असता त्याची दुचाकीही सारखी बंद पडू लागल्याने त्यानेही एका बाटलीत गाडीतील पेट्रोल काढून पाहिले असता त्यात बाटलीच्या तळाशी पाणी साचल्याचे तो म्हणाला. अभिजित अरकीलवार यालाही तसाच अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले. तर मयूर पाटील यांनी त्यांच्या वाहनात याच पंपावरून इंधन टाकले. गाडी सारखी बंद पडू लागल्याने त्यांनी गाडी कशीतरी गॅरेजवर नेली. यावेळी गॅरेजवाल्याने त्यांना इंधनमध्ये भेसळ असल्याचे सांगितले. याशिवाय ज्या लोकांनी या पंपावर इंधन भरले, त्यातील बहुतेक सर्वांना पाणीमिश्रित इंधन मिळाल्याच्या तक्र ारी घेऊन शंभरहून अधिक वाहनचालक दुपारी या पंपावर गेले. तिथे व्यवस्थापकांकडे याविषयी तक्रार केली असता तेथील कर्मचा-यांनी तक्रारदारांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तक्रारदार संतप्त झाले. यामुळे गोंधळ वाढू लागला. यामुळे गर्दी जमली. घटनेची माहिती मिळताच वेदांतनगर पोलीस, माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यासह अन्य अधिका-यांनी धाव घेतली.