शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपातळी खालावली

By admin | Updated: April 8, 2017 21:37 IST

गढीएप्रिल महिन्याच्या पूर्वार्धातच भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून, जलाशयातील साठाही दिवसेंदिवस कमी होत आहे.

विष्णू गायकवाड  गढीएप्रिल महिन्याच्या पूर्वार्धातच भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून, जलाशयातील साठाही दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे पाण्याची तीव्र समस्या निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहे. पाझर तलाव कोरडे पडल्यामुळे ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये आतापासूनच पाण्याची समस्या बिकट होण्याची भीती निर्माण झाली आहे. बहुतांश विहिरीतील पाण्याची पातळी खाली गेली असून, त्या कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना आतापासूनच पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अनेक गावांतील हातपंपातून पाणी येत नाही. नद्या-नाले कोरडे पडल्यामुळे पाण्याची समस्या अधिकच बिकट होणार आहे. पाणीसाठे संपुष्टात येण्याची चिन्हे दिसून येत असल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भीषण रूप धारण करणार आहे. पाणी समस्या निवारण्यासाठी शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत असले तरी बऱ्याच ठिकाणी आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, असा प्रश्न आहे. वाढते तापमान आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून, जलाशयातील पाण्याचा साठा संपुष्टात येत आहे. एकीकडे उन्हाची तीव्र दाहकता, तर दुसरीकडे पाण्याची टंचाई आणि जनावरांसाठी वैरण नसल्याने शेतकरी आपली जनावरे विकत आहेत.शेतकऱ्यांजवळ जनावरांना पिण्यासाठी पाणी व वैरण नाही त्यामुळे जनावरांना द्यावे तरी काय, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.खरीप हंगामात शेतीच्या लागवडीसाठी लागणाऱ्या बी-बियाणे खरेदीला पैसे नाहीत. त्यातच ही समस्या निर्माण झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. आतापासूनच पाणी टंचाईचे चटके सोसावे लागत असले तरी प्रशासन मात्र अजूनही सुस्त आहे.