शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’ला घरघर

By admin | Updated: May 12, 2017 23:33 IST

बीड : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील कामांची डेडलाईन तोंडावर आली असताना अनेक ठिकाणी कामांना प्रारंभच झालेला नाही.

राजेश खराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील कामांची डेडलाईन तोंडावर आली असताना अनेक ठिकाणी कामांना प्रारंभच झालेला नाही. अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अनेक कामे प्रक्रियेतच रखडली आहेत. गतवर्षी मे अखेरीस पहिला टप्पा पूर्ण झाला होता. मात्र, यंदा २३६९ कामांपैकी केवळ दोन हजार कामे पूर्ण झाली आहेत.जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यशानंतर जलसंधारणाच्या दृष्टीने दुसऱ्या टप्प्याकरिता २५६ गावांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या वर्षी २७१ गावांमध्ये दर्जात्मक कामे झाली होती. शिवाय, समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्याचे चित्र पलटले होते. मात्र, जलसंधारणाचे गांभीर्य संबंधित विभागांना राहिले नसल्याने कामे कासवगतीने सुरू आहेत. प्रगतीपथावरील कामांची आकडेवारी दाखवून तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडून धूळफेक केली जात आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या तोडीस जलसंधारणाकरिता सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात पाणी फाऊंडेशनची वॉटर कप स्पर्धा, नाम फाऊंडेशनची कामे प्रगतीपथावर असून, यामध्ये लोकसहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम जलयुक्त शिवार अभियानावरही झाला असल्याचे दिसून येत आहे.परळी, अंबाजोगाई या तालुक्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला असून, उप विभागीय, जिल्हाधिकारी समिती व जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवायच सहायक पर्यवेक्षक स्तरावरच कामांना मंजुरी दिली जात असल्याने अनियमितता दिसून येत आहे. त्यामुळे प्रस्तावाबाबतची आकडेवारी वरिष्ठ कार्यालयाकडे नसल्याने अवमेळ होत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या अभियानावर लक्ष केंद्रित करून पहिला टप्पा यशस्वी केला होता. दुसऱ्या टप्प्यातील कामांना सुरूवात होताच जिल्हाधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे समीकरण सुरू झाल्याने मूळ कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. नूतन जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाच्या अनुषंगाने मंगळवारी आढावा बैठक ठेवली आहे. त्यामुळे ज्या तालुक्यात कामे झाले नाहीत त्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे.