शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पाणी विके्रत्याची ‘दबंगगिरी’

By admin | Updated: June 28, 2016 00:56 IST

औरंगाबाद : ‘एस. टी.’ मध्ये खाद्यपदार्थ, पाणी बाटल्या आदींची विक्री करण्यास एस. टी. महामंडळाने निर्बंध लादले आहेत. परिणामी विके्र ते आणि चालक-वाहकांमध्ये दररोज खटके उडत आहेत.

औरंगाबाद : ‘एस. टी.’ मध्ये खाद्यपदार्थ, पाणी बाटल्या आदींची विक्री करण्यास एस. टी. महामंडळाने निर्बंध लादले आहेत. परिणामी विके्र ते आणि चालक-वाहकांमध्ये दररोज खटके उडत आहेत. अशा परिस्थितीत मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी एका पाणी विक्रेत्याने ‘दबंगगिरी’ करून वाहकाला धक्काबुक्की केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.बसस्थानकामधील विक्रेत्यांसाठी ‘एस. टी.’चे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. केवळ बसस्थानक परिसरातच खाद्यपदार्थांची विक्री करण्याची मुभा विक्रेत्यांना देण्यात आली आहे; परंतु तरीही बसस्थानकात एखादी बस प्रवेश करीत नाही, तोच त्यामध्ये प्रवेश करण्याची विक्रेत्यांमध्ये चढाओढ दिसून येते. अधिक नफा मिळविण्याच्या प्रयत्नात विक्रेत्यांकडून सर्रास थेट बसगाड्यांमध्ये जाऊन विक्री केली जात आहे. यातून अनेकदा प्रवाशांना धक्काबुक्कीचे प्रकार होतात. बसमध्ये विक्रेत्यांना विक्री करण्यापासून रोखावे, यासंदर्भात चालक-वाहकांना सूचना करण्यात आली आहे; परंतु विक्रेते अरेरावीची भाषा करून चालक-वाहकांबरोबर वाद घालतात. मध्यवर्ती बसस्थानकात रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास औरंगाबाद- नाशिक बसमध्ये पाणी विक्र ी करणाऱ्या विक्रेत्यास वाहकाने खाली उतरण्यास सांगितले. त्यावेळी विक्रेत्याने असभ्य भाषेत बोलत थेट वाहकावर हात उचलला. यावेळी विक्रेत्याने वाहकास धक्काबुक्की केली. हा प्रकार समजताच अन्य कर्मचाऱ्यांनी विक्रेत्यास बसस्थानकातील पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले. अशा परिस्थितीमुळे पूर्वीप्रमाणे प्रवासी मित्र पथकाची स्थापना करण्याची मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.