शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी वितरणाचा तपशील मनपाच्या वेबसाईटवर

By admin | Updated: May 5, 2016 00:21 IST

लातूर : लातूर शहरात दररोज पाणी वितरीत करण्यात आलेल्या व दुसऱ्या दिवशी करण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रभागनिहाय तपशील महापालिकेच्या वेबसाईटवर दररोज प्रकाशित केला जात आहे.

लातूर : लातूर शहरात दररोज पाणी वितरीत करण्यात आलेल्या व दुसऱ्या दिवशी करण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रभागनिहाय तपशील महापालिकेच्या वेबसाईटवर दररोज प्रकाशित केला जात आहे. १३५ टँकरच्या ६६ फेऱ्यांतून ४९.३४ लाख आणि गुरुत्व वाहिनीवरील स्टँड पोस्टवरून १० लाख लिटर पाणी नागरिकांना दररोज वितरीत केले जात आहे. दररोज एकूण ६० लाख लिटर्स पाणी वितरीत केले जात आहे. लातूर शहराला दररोज २५ लाख लिटर्स पाणी रेल्वेने उपलब्ध होत असून, बेलकुंड व डोंगरगाव येथून टँकरर्सद्वारे सरासरी ३५ ते ४५ लाख लिटर्स पाणी उपलब्ध होत आहे. अशा प्रकारे सध्या शहरात दररोज सरासरी ६० ते ७० लाख लिटर्स पाणी संकलित केले जात आहे. या पाण्याच्या वितरणाचे काटेकोरपणे नियोजन मनपाने केले असल्याचे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले. १३५ टँकरच्या ६६६ फेऱ्यांद्वारे ४९.३४ लाख लिटर्स पाणी शहरातील प्रभागांमध्ये वितरीत केले जात आहे. तसेच शहरातील पाच जलकुंभ, हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्र, मुख्य गुरुत्व वाहिनीवरील स्टँड पोस्ट वाहिनीवरून दहा लाख लिटर्स पाण्याचे वितरण केले जात आहे. पारदर्शकरित्या पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाकडून प्रयत्न सुरू आहेत. शहरातील गांधी चौक, नांदेड नाका, सरस्वती कॉलनी, आर्वी टाकी तसेच हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्र येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, शहरांतर्गत व शहराबाहेरुन पाणी आणणाऱ्या सर्व टँकर्सना जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे. त्याची लिंक महानगरपालिकेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच शहरात दररोज करण्यात आलेल्या व दुसऱ्या दिवशी करण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रभागाचा पाणी वितरणाचा तपशीलही महानगरपालिकेच्या वेबसाईटवर दररोज प्रकाशित केला जात आहे, असेही मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले. (प्रतिनिधी)२४ तास नियंत्रण कक्ष : तक्रार असेल तर टोलफ्रीवर संपर्क साधापारदर्शकपणे पाण्याचे वितरण करण्यासाठी मनपाने उपाययोजना व नियोजन केले आहे. शिवाय, नागरिकांच्या काही तक्रारी आल्यास २४ तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे. पाण्याबाबत काही तक्रारी असतील तर नागरिकांनी थेट नियंत्रण कक्षाचा १८००२३३१३८०८ व ०२३८२-२५५५८५ या क्रमांकावर संपर्क साधावा. आलेल्या तक्रारींची दखल तात्काळ घेऊन नियोजन केले जाईल, असे महानगरपालिका प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.