जालना : घाणेवाडी जलाशय कोरडेठाक पडण्याचा मार्गावर आहे. अत्यल्प पाणी असल्याने नगर पालिकेच्या फिल्टरबेडमध्ये ठणठणाट निर्माण झाला आहे. फिल्टरबेड मधील बहुतांश यंत्रणेचे काम थांबले आहे. निजामकालीन निर्मित या जलाशयातून गॅ्रव्हीटी तत्वानुसार जेईएस महाविद्यालयाच्याा मागील बाजूस असलेल्या फिल्टर बेडमध्ये येते. दिवसाकाठी तीन ते चार एमएलडी पाण्याचे येथे शुद्धीकरण होते. फेब्रुवारी महिन्यापासून जलाशयातील पाणीपातळी घटल्याने फिल्टरबेडमधील काम थांबले आहे. शुद्धीकरणासाठी पाणीच नसल्याने मोठे हौद तसेच इतर प्रक्रिया यंत्रणा बंद आहे. हे फिल्टरबेडही निजाम कालीन आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी मोठे चार हौद आहेत. या हौदातील पाणी संपत आले आहे. घाणेवाडी जलाशयात साधारणपणे एक फूट पाणी असावे. हे पाणी मार्च महिना अथवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेल असे पाणीपुरवठा सभापती राहुल हिवराळे यांनी सांगितले. तलावातील पूर्ण पाण्याचा वापर करून जनतेची तहान भागविली जाणार आहे. (प्रतिनिधी)
जालना फिल्टरबेडमध्ये पाण्याचा ठणठणाट
By admin | Updated: March 21, 2016 00:13 IST