शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘जलसंधारणा’मुळे फुलले शिवार

By admin | Updated: April 9, 2017 23:37 IST

शिराढोणसतत दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांची जणू चळवळ उभी राहिली आहे़

राहुल ओमने शिराढोणसतत दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांची जणू चळवळ उभी राहिली आहे़ कळंब तालुक्यातील शिराढोण गावच्या शिवारातील ढोरी नदीपात्राच्या खोलीकरण-रूंदीकरण कामामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यातही विहिरी, कुपनलिकांना मुबलक पाणी उपलब्ध आहे़ जलयुक्तच्या कामांमुळे या भागातील शिवारही फुलला आहे़मागील चार-पाच वर्षात जिल्हावासियांना पाणीटंचाई, चारा टंचाईचा न भूतो न भविष्यती प्रश्नही अनुभवास आला़ दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या़ सतत निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनी एकत्रित येऊन लोकसहभागातून जलसंधारणाची कामे हाती घेतली आहेत़ यात सर्वाधिक कामे ही नदी पात्रातील खोलीकरण- रूंदीकरणाची झाली आहेत़ कळंब तालुक्यातील शिराढोण गावच्या शिवारातील ढोरी नदीपात्रात मागील दोन वर्षात तीन किलोमीटरवर खोलीकरण- रूंदीकरणाचे काम झाले आहे़ गावातील कैलास पाटील, किरण पाटील, सचिन पाटील, हनुमंत सोमासे, रणजित पाटील, राजेश्वर पाटील यांच्यासह इतर शेतकरी व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन लोकवाटा जमा करून सुरू केलेले काम आज या गावासाठी उन्हाळ्यातही संजीवनीसारखे ठरत आहे़ या कामासाठी असलेल्या यंत्रणांवर दोन लाख रूपयांचे डिझेल, खोलीकरण-रूंदीकरणातून निघालेली माती शेतात व इतरत्र टाकण्यासाठी ३२ लाख रूपयांचा खर्च लोकवाट्यातून झाला आहे़ तर शासनाकडून १६ लाखाची मदत मिळाली असून, आ़ राणाजगजितसिंह पाटील यांनी आमदार फंडातून दोन लाखाचा निधी या कामासाठी दिला आहे़ या निधीतून गावच्या शिवारातील ढोरी नदीचे ३ किलोमीटरचे खोलीकरण-रूंदीकरणाचे काम करण्यात आले आहे़ या कामाची रूंदी तब्बल ४२ फूट तर खोली १४ फूट आहे़ गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे या खोलीकरण कामात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला होता़ तर सध्याच्या भर उन्हाळ्यातही जलस्त्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी असून, शिवार हिरवागार दिसत आहे़