माजलगाव : तालुक्यातील फुलेपिंपळगाव येथे पाण्याच्या कारणावरून एकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा नोंद झाला. ही घटना शनिवारी घडली.फुलेपिंपळगाव येथे सर्व्हे क्र. ६ मध्ये धरणाचे पाणी शेतीसाठी चारीद्वारे सोडले आहे. पाणी घेण्यावरून श्रीधर मनोहर साळवे यांना गावातीलच सत्तार जब्बार पठाण, शेख इस्माईल शेख खदीर यांनी शनिवारी सकाळी जातीवाचक शिवीगाळ केली. शिवाय, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. याप्रकरणी साळवे यांच्या फिर्यादीवरून अॅट्रॉसिटी अन्वये ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला. आरोपी फरार असून, तपास सहायक अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन. हे करीत आहेत. (वार्ताहर)
पाणी पेटले; दोघांवर अॅट्रॉसिटी
By admin | Updated: April 2, 2017 00:07 IST